तरुणांसोबतच मुलांमध्ये वाढतोय मानसिक ताण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:13+5:302021-05-09T04:19:13+5:30
अनेकांना कोरोनाविषयी फोबिया कोरोनाकाळात आवश्यक खबरदारी ही गरजेची आहे, मात्र कारण नसतानाही अनेकांमध्ये भीतीचे प्रकार समोर आले आहेत. हा ...
अनेकांना कोरोनाविषयी फोबिया
कोरोनाकाळात आवश्यक खबरदारी ही गरजेची आहे, मात्र कारण नसतानाही अनेकांमध्ये भीतीचे प्रकार समोर आले आहेत. हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. याशिवाय अनेक जण गरजेपेक्षा जास्त स्वच्छता बाळगत असून, हादेखील एक प्रकारचा मानसिक आजारच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामध्ये प्रामुख्याने वारंवार हात धुणे, वारंवार अंघोळ करणे, घराबाहेर न निघणे आदी प्रकार दिसून येतात.
चिंता, निद्रानाश, कोरोनाची भीती, भविष्याची चिंता,
चिडचिडेपणा वाढला आहे.
लहान मुलांमध्ये वाढली चिडचिड
लहान मुलांच्या शाळा बंद झाल्याने ते त्यांचा बहुतांश वेळ मोबाइलवर घालवत आहेत. त्यामुळे त्यांचा पालकांसोबतचा संवाद संपला आहे. परिणामी त्यांच्यातील चिडचिड वाढली असून, हादेखील डिप्रेशनचाच प्रकार असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
तरुणांनी हे करावे
दिनचर्या पूर्वीप्रमाणेच ठेवावी.
नियमित व्यायाम, योगा करावा.
सकारात्मक विचार करा.
खाली वेळेत इतर कौशल्य विकसित करावी.
पौष्टिक आहार घ्या.
घरीच आहात तर कुटुंबीयांशी संवाद साधा.
काेरोनाकाळात अनेकांच्या जीवनशैलीत बदल झाला असून, त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाल्याचे दिसून येते. तरुणांनी विशेषत: शाळकरी मुलांनी या वेळेत कुटुंबीयांशी संवाद साधावा. तसेच इतर कौशल्ये विकसित करण्यातही हा वेळ घालवावा.
- डॉ. अनुप राठी, मानसोपचारतज्ज्ञ, अकोला