खामगाव :मानसिकदृष्ट्या कमकुवत अल्पवयीन युवतीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:52 AM2019-12-11T11:52:00+5:302019-12-11T11:57:03+5:30
एका अल्पवयीन युवतीवर दोघांनी अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील घाटपुरी येथील एका अल्पवयीन युवतीवर दोघांनी अत्याचार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. घटना उघडकीस येताच शिवाजी नगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच तातडीने दोघांनाही अटक केली. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
हैद्राबाद येथील दिशा अत्याचार प्रकरण आणि बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे एका ५५ महिलेवर अत्याचार आणि त्यानंतर तिचा निर्घूण करण्यात आल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांच्या पडसादाचे मोहोळ शमत तोच, मंगळवारी रात्री खामगाव तालुक्यातील एका मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुमारिकेवर दोघांनी अत्याचार केल्याचे समोर आले. घाटपुरी येथील मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेली एक अल्पवयीन युवती मंगळवारी सायंकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एकाने तिने गाठले. लग्नाचे आमीष देऊन निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर निर्जनस्थळी आणि परिसरातील एका झोपडीत अत्याचार केला. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने घरातील मंडळींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान तिने सर्व हकीकत कथन केल्यानंतर घरातील मंडळींनी तिला सोबत घेत, पोलिस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक रविंद्र देशमुख यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. गावात शोध मोहिम राबवून दोन आरोपींना अटक केली आणि दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
ज्ञानेश्वर तायडे आणि दत्ता साठे अशी आरोपींची नावे आहे. आरोपी विरोधात भादंवी ३७६(डी), ३७६(२),(आय), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम -५ (ग), ५ (क) आणि कलम ६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास शिवाजी नगर पोलिस करीत आहेत.