अन् गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता घरी पोहोचवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:24 AM2020-09-21T11:24:25+5:302020-09-21T11:24:45+5:30

रात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांच्या वाहनाने सदर युवतीला मनारखेड येथे पोहोचवले.

Mentaly ill girl taken home at 3 pm! | अन् गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता घरी पोहोचवले!

अन् गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता घरी पोहोचवले!

Next


अकोला : अंदाजे २१ वर्षांची एक युवती मलकापूर परिसरात रात्री ११ वाजताच्या सुमारास फिरत असताना काही दारुड्या युवकांनी तिचा पाठलाग सुरू केल्याची बाब सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर येताच या कार्यकर्त्याने सजगता दर्शवित पोलिसांची मदत घेतली अन् या गतिमंद युवतीला रात्री ३ वाजता तिच्या घरी सुखरूप सोडता आले.
अकोल्यातील मलकापूर परिसरात शनिवारी रात्री घडलेला हा प्रसंग. एक २१ वर्षांची युवती विमनस्क स्थितीत भटकत होती. याच युवतीच्या मागावार एक मद्यधुंद इसम असल्याची बाब याच परिसरातील युवकांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांना कळविले. गवई यांनी सजगता दर्शवित खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार डी. सी. खंडेराव यांना मोबाइलवरून माहिती दिली. अन् पोलीस त्याच तत्परतेने मलकापुरात पोहोचले. त्यांनी युवतीची विचारपूस केली असता तिने केवळ तिचे नाव सांगितले व गावाचे नावही सांगितले; मात्र इतर कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हती. या दरम्यान सदर युवती गतिमंद असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात नेले. या दरम्यान पोलिसांनी आपले चक्र फिरविले असता ती युवती बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथील असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ गावात संपर्क करून खात्री केली. आई-वडिलांच्या मायेला पोरकी झालेल्या युवतीचा सांभाळ तिचे वयोवृद्ध आजोबा करतात. तिला एक बहीण असून, तिचा विवाह झाला आहे, ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रात्री ३ वाजता पोलिसांनी त्यांच्या वाहनाने सदर युवतीला मनारखेड येथे पोहोचवले. या सर्व प्रकरात पोलीस कर्मचारी गणेश उज्जैनकर, यशोदाबाई पैठणकर, मोइन खान, गजानन मानकर अमित दारोकार, सागर कनोजिया, सिद्धार्थ सिरसाट, मनीष कनोजिया, हरीश उपाध्याय व मनीष चौधरी अंकुश गवळी यांची सजगता कामात आली.

 

Web Title: Mentaly ill girl taken home at 3 pm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.