व्यापार्यांच्या तूर खरेदीची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:07 AM2017-08-09T03:07:29+5:302017-08-09T03:08:17+5:30
अकोला : जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी उपविभागीय कृषी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांकडून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. शेतकर्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे लावली, यासंदर्भात या तपासणीत माहिती घेतली जात आहे.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी उपविभागीय कृषी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांकडून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. शेतकर्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे लावली, यासंदर्भात या तपासणीत माहिती घेतली जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत काही व्यापार्यांकडून खरेदी करण्यात आलेली शेतकर्यांची तूर जिल्हय़ातील हमीदराच्या खरेदी केंद्रांवर विकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिला.
त्यानुषंगाने तपासणीसाठी जिल्हय़ातील उपविभागीय कृषी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील समित्या गठित करण्यात आल्या. उपविभागीय कृषी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील या समित्यांमध्ये सदस्य म्हणून संबंधित तालुका सहनिबंधक (सहकारी संस्था), पंचायत समितीचे लेखाधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी इत्यादींचा समावेश आहे. जिल्हय़ातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या तुरीची तपासणी या समित्यांकडून ७ ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे.
व्यापार्यांनी शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे लावण्यात आली, याबाबतची सविस्तर माहिती तपासणीत घेतली जात आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर समित्यांमार्फत लवकरच जिल्हाधिकार्यांकडे तपासणीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
‘या’ मुद्यांची घेतली जात आहे माहिती!
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्यांनी खरेदी केलेली तूर कोणाची आहे?
व्यापार्यांनी शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट कोठे आणि कशी लावली?
व्यापार्यांनी शेतकर्यांकडून खरेदी केलेली तूर पुन्हा शेतकर्यांच्या नावावर हमीभावाच्या तूर खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी आणण्यात आली काय, खरेदी केंद्रांवर व्यापार्यांकडून तूर खरेदी करण्यात आली काय? इत्यादी मुद्यांची माहिती तपासणीत घेण्यात येत आहे.
७0 व्यापार्यांची होणार तपासणी?
जिल्हय़ातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दहा याप्रमाणे जिल्हय़ातील सातही बाजार समिती अंतर्गत ७0 व्यापार्यांकडून करण्यात आलेल्या तूर खरेदीची माहिती या तपासणीत घेण्यात येत आहे.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्हय़ात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापार्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या शेतकर्यांच्या तुरीची विल्हेवाट कोठे लावण्यात आली, यासंदर्भात तपासणी सुरू करण्यात आली आहे.
-जी.जी. मावळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)