व्यापारी, हमालांना कोरोना; बाजार समितीची खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:20 AM2021-03-23T04:20:11+5:302021-03-23T04:20:11+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, अडते, हमाल, मदतनीस यांची कोरोना चाचणी करून घेण्यासाठी १६ ते १९ मार्च चार ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, अडते, हमाल, मदतनीस यांची कोरोना चाचणी करून घेण्यासाठी १६ ते १९ मार्च चार दिवस तपासणी शिबिराचे आयोजन स्थानिक प्रशासनातर्फे घेण्यात आले. या दरम्यान बाजार समितील जणांची तपासणी करून घेण्यात आली. यात व्यापारी, अडते, कर्मचारी, हमाल, मदतनीस यांची तपासणी करण्यात आली असून, ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पैकी ३० अडते, व्यापारी, हमाल व मदतनीस पॉझिटिव्ह आल्याने, याचा परिणाम धान्य खरेदी-विक्रीवर झाला असून, अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. बाजार समितीत हजारो क्विंटल धान्य पडून असून, त्याची प्रथम खरेदी करून, नंतरच बाहेरील धान्य खरेदीसाठी बाजार समिती खुली करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना हेंडज येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे.
काेट
बाजार समितीत घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान अडते, व्यापारी, हमाल, मदतनीस असे ३० लोक पॉझिटिव्ह आले असल्याने, खरेदी अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. तथापि बाजार समितीमध्ये पूर्वीच पडून असलेल्या मालाची खरेदी करून नंतर बाजार समिती पूर्ववत सुरू करण्यात येईल.
रितेश मडगे सचिव, कृषी उत्पादन बाजार समिती, मूर्तिजापूर