तेरवीचा खर्च टाळून स्मशानभूमीला जाळीचे कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:21 AM2021-09-26T04:21:01+5:302021-09-26T04:21:01+5:30
हाता : रूढी-परंपरांना फाटा देत बाळापूर तालुक्यातील हाता येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक सेवकराम गावंडे यांनी तेरवीचा खर्च टाळून गावातील ...
हाता : रूढी-परंपरांना फाटा देत बाळापूर तालुक्यातील हाता येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक सेवकराम गावंडे यांनी तेरवीचा खर्च टाळून गावातील स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेत विकासकामासाठी निधी दिला. यामधून त्यांनी स्मशानभूमीला कुंपण उभारले आहे.
बाळापूर तालुक्यातील येथील हाता येथे ग्रामविकास युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच गावात विकासकामे होतात. वडील सेवकराम पांडुरंग गावंडे यांचे निधन झाले. त्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या तेरवी, दसवा यांसारख्या रूढी-परंपरांना फाटा देत दीपक सेवकराम गावंडे यांनी तेरवीचा कार्यक्रम साधेपणाने करून उर्वरित निधीतून हिंदू स्मशानभूमीला कुंपण घेतले आहे.
येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच या भागात शौचास बसणाऱ्यांमुळे दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांची समस्या लक्षात घेत दीपक गावंडे यांनी ग्रामविकास युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्मशानभूमीला कुंपण घेऊन गेट बांधले आहे. या उपक्रमामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
250921\1637-img-20210924-wa0011.jpg
s