‘तंबाखूमुक्त भारत माझे स्वप्न’ विषयावर विद्यार्थ्यांनी निबंधातून दिला संदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:53+5:302021-09-24T04:22:53+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजाबराव गुडदे होते, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मानाचे ठाणेदार कैलास भगत, विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन गिरी, ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजाबराव गुडदे होते, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मानाचे ठाणेदार कैलास भगत, विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन गिरी, शिक्षक नागसेन गेडाम, सतीश गोकने, संजय अंभोरे, विनोद बापू देशमुख, संजय भेंडकर, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गिरी यांनी केले. यावेळी ठाणेदार कैलास भगत यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त भारत करण्याचे आवाहन केले. तसेच व्यसनाचे दुष्परिणाम आणि वैयक्तिक सुरक्षा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. खंडेराव पांडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, व्यवस्थापन समिती, तसेच शिपाई विनोद देशमुख यांनी परिश्रम घेतले.
निबंध स्पर्धेत यांनी पटकावली बक्षिसे
यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिया वाहणे, द्वितीय क्रमांक प्रणिता अवझाडे, तृतीय क्रमांक श्रुतिका गुडदे, चतुर्थ क्रमांक अनिकेत खंडारे व पाचवा क्रमांक अपर्णा चक्रे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रोत्साहनपर प्रमाणपत्राचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
फोटो :
230921\img_20210918_174944.jpg
निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरण करतांना ठाणेदार कैलास भगत