मतदान प्रक्रियेवर राहणार सूक्ष्म निरीक्षकांचा ‘वॉच’!

By admin | Published: January 29, 2017 02:41 AM2017-01-29T02:41:01+5:302017-01-29T02:41:01+5:30

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी पाच जिल्ह्यात २८0 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक

Micro Observers 'Watch' to be held in the polling process! | मतदान प्रक्रियेवर राहणार सूक्ष्म निरीक्षकांचा ‘वॉच’!

मतदान प्रक्रियेवर राहणार सूक्ष्म निरीक्षकांचा ‘वॉच’!

Next

संतोष येलकर
अकोला, दि. २८- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील पाचही जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारसंघातील पाचही जिल्ह्यातील मतदान केंद्रावर २८0 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, सूक्ष्म निरीक्षकांचे मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष (वॉच ) राहणार आहे.
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्हय़ांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पाचही जिल्हय़ात २८0 मतदान केंद्रांवर ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ात २८0 मतदान पथके गठित करण्यात आली आहेत, तसेच मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पाचही जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रत्येकी एक प्रमाणे सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या आदेशानुसार, विभागातील पाचही जिल्ह्यात २८0 सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया दरम्यान मतदान केंद्रांवरील हालचालींवर सूक्ष्म निरीक्षकांचे विशेष लक्ष राहणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यात नेमण्यात आलेल्या या सूक्ष्म निरीक्षकांमध्ये केंद्र शासन अंतर्गत डाक विभाग, बँका, भारतीय जीवन विमा व इतर कार्यालयांच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे.

मतदार याद्या तहसील कार्यालयांमध्ये !
अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पदवीधर मतदारांना अनुक्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या गत मंगळवारी तहसील कार्यालयांमध्ये लावण्यात आल्या आहेत.

Web Title: Micro Observers 'Watch' to be held in the polling process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.