सभागृहात भिरकावला माइक; जिल्हाधिकारी गेल्या निघून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:24+5:302021-08-13T04:23:24+5:30
दोन वर्षांपासून कामे रखडली; अधिकाऱ्यांसह कंत्रादारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश! तेल्हारा तालुक्यातील वणी वारुळा ते वरवट बकाल आणि आडसूल ...
दोन वर्षांपासून कामे रखडली; अधिकाऱ्यांसह
कंत्रादारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश!
तेल्हारा तालुक्यातील वणी वारुळा ते वरवट बकाल आणि आडसूल ते हिवरखेड या दोन्ही रस्त्यांची कामे दोन वर्षांपासून रखडल्याने रस्त्यांवर अनेक अपघात झाले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. तसेच दोन्ही रस्त्यांच्या कामांचे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देऊन दर्जेदार व जलदगतीने काम करणाऱ्या कंत्राटदारास कामे देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
अभियंत्यांसह कंत्राटरावर ठपका
ठेवून दंडात्मक कारवाई करा!
रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या संबंधित अभियंत्यांसह कंत्राटदारावर ठपका ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता नवघरे यांना या बैठकीत देण्यात आले. संबंधित रस्ते कामांसंदर्भात येत्या २४ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून माहिती घेण्यात येणार असून, त्यानंतर कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी बैठकीत सांगितले.