अकोला जिल्ह्यात जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 08:45 PM2021-04-17T20:45:31+5:302021-04-17T20:47:31+5:30

रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० इतकी नोंदविण्यात आली.

Mild tremor felt in Akola district! | अकोला जिल्ह्यात जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का!

अकोला जिल्ह्यात जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का!

googlenewsNext
ठळक मुद्देभूगर्भात १६ किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. कासारखेड भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

अकोला: अकोला शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर बाळापूरमधील कासारखेड भागात शनिवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० इतकी नोंदविण्यात आली.

अकोला शहराच्या पश्चिमेस १९ किलोमीटर अंतरावर बाळापूर येथील कासारखेड परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूगर्भात १६ किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. रिस्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.० इतकी नोंदविण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगीतले. जिल्हयातील बाळापूर येथील कासारखेड भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असून, कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

बाळापूरमधील कासारखेड भागात सौम्य भूकंपाचा धक्का जाणवल्याचे या भागातील काही नागरिकांनी सांगीतले. भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

डाॅ.रामेश्वर पुरी

उपविभागीय अधिकारी, बाळापूर.

Web Title: Mild tremor felt in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.