अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; ३.५० रिक्टर स्केल इतकी तीव्रता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 09:52 PM2022-06-11T21:52:34+5:302022-06-11T21:52:49+5:30

या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही,असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Mild tremors in Akola district; Intensity of 3.50 Richter scale | अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; ३.५० रिक्टर स्केल इतकी तीव्रता

अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के; ३.५० रिक्टर स्केल इतकी तीव्रता

Next

अकोला- बार्शी टाकळी जवळ (अकोला शहरापासून २३ किमी अंतरावर)आज सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून मालमत्तेचे वा कोणतीही  जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. 

यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, हवामान विभाग अकोलाचे वैज्ञानिक सहायक मिलिंद धकिते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या आधारे  माहिती दिली आहे. त्यानुसार आज सायंकाळी पाच वाजून ४१ मि.१८ सेकंदांनी या धक्क्याची नोंद झाली. २०.५३०N व ७७.०८०E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल वर ३.५० इतकी तीव्रता नोंदविण्यात आली.या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही,असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Mild tremors in Akola district; Intensity of 3.50 Richter scale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.