दूध व्यवसाय संकटात, दूध डेअरीतून वितरणाची परवानगी द्यावी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:43+5:302021-05-12T04:18:43+5:30
कोरोना महामारीमुळे अनेक नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करून दूध विक्री केली जात होती. परंतु नवीन आदेश ...
कोरोना महामारीमुळे अनेक नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करून दूध विक्री केली जात होती. परंतु नवीन आदेश आल्याने दूध व्यवसाय करणारे संकटात सापडले आहेत. शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे घरपोच दूध विक्री करण्याचा प्रयत्न मूर्तिजापूर शहरातसुद्धा करण्यात येत आहे. परंतु त्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत दूध उत्पादकांनी आपला प्रपंच कसा चालवावा. दूध ही अत्यावश्यक गरज आहे. परंतु दुधाची विक्री होत नसेल तर व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ९ ते १५ मेपर्यंत काढलेल्या आदेशामध्ये घरपोच दूध विक्रीव्यतिरिक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला बंदी घातली आहे. या जाचक अटीविरुद्ध जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष झाकीर उल्ला खा पटेल व ह. भ. प. वासुदेवराव महल्ले महाराज, दूध संघाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत हजारी यांच्यासह अकोला जिल्ह्यातील दूध व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष मोहन देशमुख, रोहित राजेंद्र पुंडकर, संघाचे व्यवस्थापक गोविंदराव आगे, संघाचे संचालक अन्सार खान, जुबेर अली आदी हजर होते.