‘जलयुक्त’चा कोट्यवधी निधी परतीच्या मार्गावर!

By admin | Published: March 24, 2017 02:08 AM2017-03-24T02:08:03+5:302017-03-24T02:08:03+5:30

‘मार्च एन्डिंग’ला उरले सात दिवस; अखर्चित १५0 कोटी खर्चाचे आव्हान.

Millennium Fund of 'Jalukta' returns on the path! | ‘जलयुक्त’चा कोट्यवधी निधी परतीच्या मार्गावर!

‘जलयुक्त’चा कोट्यवधी निधी परतीच्या मार्गावर!

Next

संतोष येलकर
अकोला, दि. २३- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यात यावर्षी निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये कामे करण्यासाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर असला, तरी जिल्ह्यात २३ मार्चपर्यंंत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पूर्ण झालेल्या ६0६ कामांवर केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असल्याने, जलयुक्त शिवार अभियानातील कामांचा अखर्चित निधी यंदाही शासनाकडे परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्यानुषंगाने अखर्चित निधी ह्यमार्च एन्डह्ण पर्यंत खर्च करण्याचे आव्हान जिल्ह्यातील यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे.
राज्यात वारंवार निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनामार्फत गत तीन वर्षांंपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी घोषीत केला होता. या अभियानांतर्गत करण्यात येणार्‍या कामांमुळे पाणीसाठय़ात वाढ होत असून, उपलब्ध पाणीसाठय़ाचा शेती सिंचनासाठी उपयोग होत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २0१६-१७ या वर्षात अकोला जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये ह्यजलयुक्त शिवारह्णची ३ हजार ९६३ कामे करण्याचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विविध यंत्रणांमार्फत ही कामे करावयाची असून, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांसाठी १५५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मंजूर कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असला, तरी मंजूर कामांपैकी २३ मार्चपर्यंंत जिल्ह्यात केवळ ६0६ कामे पूर्ण करण्यात आली असून, उपलब्ध निधीपैकी केवळ ५ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर आराखड्यातील उर्वरित ३ हजार ३५७ कामे अद्याप पूर्ण होणे बाकी असून, या कामांचा १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अखर्चित आहे. ह्यमार्च एन्डिंगह्णला केवळ सात दिवसांचा कालावधी उरला असून, जिल्ह्यात ह्यजलयुक्त शिवारह्ण कामांसाठी उपलब्ध अखर्चित निधी ह्यमार्च एन्डिंगह्णपर्यत खर्च करण्याचे आव्हान यंत्रणांसमोर निर्माण झाले आहे. अखर्चित निधी सात दिवसांच्या कालावधीत खर्च होणार नसल्याने, गतवर्षीप्रमाणे यंदाही कामांचा कोट्यवधींचा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रखडलेली अशी आहेत कामे!
 जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात मंजूर असलेली कामे कृषी विभाग, जलसंधारण, जिल्हा परिषद, पाटबंधारे, वन विभाग व सामाजिक वनीकरण इत्यादी यंत्रणांमार्फत करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मंजूर कामांसाठी निधी उपलब्ध असला, तरी ३ हजार ३५७ कामे रखडली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध खोलीकरण, खोदतळे, शेततळे, नाला खोलीकरण, समतल चर, गाव तलाव, पाझर तलावांची दुरुस्ती, विहिरींचे पुनर्भरण इत्यादी कामांचा समावेश आहे.
यंत्रणांच्या उदासीनतेत अडकली कामे!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ात निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये यंत्रणानिहाय कामे मंजूर करण्यात आली; मात्र संबंधित यंत्रणांमार्फत कामे सुरू करण्याची प्रक्रिया संथगतीने राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून करावयाची कामे मार्गी लागली असली, तरी यंत्रणांमार्फत करावयाच्या कामांमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करावयास होणारा विलंब आणि कामातील संथगती इत्यादी कारणांमुळे जिल्हय़ात यंत्रणांच्या उदासीनतेत जलयुक्त शिवार अभियानातील कामे अडकल्याचे चित्र आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील कामांना गत पंधरा दिवसांपासून गती आली असली, तरी येत्या मार्च अखेरपर्यंंत जिल्हय़ातील कामे आणि त्यासाठी उपलब्ध निधी खर्च होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
६0६ कामे पूर्ण; ३३५७ कामे प्रलंबित!
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हय़ातील १२५ गावांमध्ये यावर्षी ३ हजार ९६३ कामे मंजूर असून, त्यापैकी आतापर्यंंत ६0६ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ३ हजार ३५७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या कामांवर ५ कोटी ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, उर्वरित ३ हजार ३३५७ कामांचा १५0 कोटी १ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे.

Web Title: Millennium Fund of 'Jalukta' returns on the path!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.