लाल-पिवळ्या टरबुजाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:19+5:302021-03-25T04:18:19+5:30

देशात मोठ्याप्रमाणात पारंपारिक शेती केली जातोय. परंतु मूर्तिजापुरातील ऋषिकेश तिकडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात वेगळा प्रयोग केलाय. यंदा त्यांनी ...

Millions earned from red-yellow watermelon farming! | लाल-पिवळ्या टरबुजाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न!

लाल-पिवळ्या टरबुजाच्या शेतीतून लाखोंचे उत्पन्न!

Next

देशात मोठ्याप्रमाणात पारंपारिक शेती केली जातोय. परंतु मूर्तिजापुरातील ऋषिकेश तिकडे या शेतकऱ्याने आपल्या शेतात वेगळा प्रयोग केलाय. यंदा त्यांनी पिवळ्या टरबुजाचे उत्पादन घेतले. आपल्या दहा एकरातील एका एकरात पिवळे टरबुज तर नऊ एकरात लाल टरबूजाची लागवड केली. त्यांनी केलेल्या या पिवळ्या टरबूजाच्या शेतीला यश आले असून हे पिवळे टरबुज लाल टरबुरापेक्षाही गोड असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ४ वर्षांपासून आठ ते दहा एकरात लाल रंगाच्या टरबुजाची लागवड करणाऱ्या या शेतकऱ्याला नेटवरुन पिवळ्या टरबुजाची माहिती मिळाली. त्यानंतर ऋषिकेशने पिवळ्या टरबुजाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्याने या टरबुजाची लागवड करण्यासाठी बियाणे मागवले. तसेच या शेतीची पुर्ण माहिती घेऊन एका एकरात ही शेती करण्यास सुरुवात केलीय. त्याने ही शेती करण्यासाठी ४० हजारांची गुंतवणूक करुन एक लाखांचा निव्वळ नफा मिळवलाय. दरम्यान नागरिकांची सुद्धा या फळाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

फोटो:

Web Title: Millions earned from red-yellow watermelon farming!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.