घंटागाडी, ट्रॅक्टरच्या इंधनावर लाखोंची उधळपट्टी; समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:23 PM2019-09-23T12:23:00+5:302019-09-23T12:23:06+5:30

वर्षाकाठी १ कोटी ८० लाख रुपयांची उधळपट्टी करीत असले तरी साफसफाईच्या कामासह इतर समस्या निकाली निघत नसल्याचे चित्र आहे.

Millions of spent on garbage vehcles and tractor fuel; The problem persists | घंटागाडी, ट्रॅक्टरच्या इंधनावर लाखोंची उधळपट्टी; समस्या कायम

घंटागाडी, ट्रॅक्टरच्या इंधनावर लाखोंची उधळपट्टी; समस्या कायम

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने १२१ घंटागाड्यांसह २० ट्रॅक्टर व भाडेतत्त्वावरील ३३ खासगी ट्रॅक्टरची व्यवस्था केली असून, आठ जेसीबी व सहा टिप्पर आदी वाहनांचा इतर कामांसाठी वापर केला जातो. यामध्ये घंटागाड्यांचा वापर संबंधित चालक निर्धास्तपणे खासगी कामासाठी करीत असल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. या संपूर्ण वाहनांवर महापालिका प्रशासन महिन्याकाठी १५ ते १६ लाख रुपये याप्रमाणे वर्षाकाठी १ कोटी ८० लाख रुपयांची उधळपट्टी करीत असले तरी साफसफाईच्या कामासह इतर समस्या निकाली निघत नसल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले आहे.
प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. शहरातील सार्वजनिक जागा, मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्ते, सर्व्हिस लाइन, नाल्यांची दररोज साफसफाई करण्यासाठी प्रशासनाने सुमारे अकराशेपेक्षा अधिक सफाई कामगारांची नियुक्ती केली. सर्व्हिस लाइनमधून निघणारा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाच्या मालकीचे २० आणि भाडेतत्त्वावर ३३ ट्रॅक्टर कार्यान्वित केले आहेत. तसेच घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२१ पेक्षा अधिक घंटागाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्थातच, या सर्वांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची असली तरी काही कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे घंटागाडी चालकांच्या मनमानीला ऊत आला आहे.
प्रभागातून जमा होणारा कचरा नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर टाकणे अपेक्षित आहे. तसे न करता बहुतांश घंटागाडी चालक सोयीनुसार शहरालगतच्या खुल्या जागा, राष्ट्रीय महामार्गालगतच्या खुल्या जागांवर कचरा टाक त आहेत. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शहराच्या चारही बाजंूनी फेरफटका मारल्यास क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक व घंटागाडी चालकांचा कर्तव्यदक्षपणा उघडकीस येईल, हे निश्चित मानल्या जात आहे.
घंटागाडीच्या इंधनात गोलमाल!
घंटागाडीमध्ये दररोज नेमके किती लीटर इंधन आवश्यक आहे, याचा मध्यंतरी आयुक्त संजय कापडणीस यांनी आढावा घेतला असता, मोटर वाहन विभागासह आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा पर्दाफाश झाला होता. अनेक घंटागाडी चालक वाहनातील कचरा नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक करीत नसल्याचे समोर आले. त्या वाहनाच्या डम्पिंग ग्राउंडवरील एकूण फेऱ्या तपासल्या असता, इंधनात घोळ होत असल्याचे उघडकीस आले होते.
पैसे द्या, घंटागाडी उपलब्ध!
घंटागाडी चालकांनी दुपारी २ किंवा ३ वाजतापर्यंत त्यांची वाहने मोटर वाहन विभागात जमा करणे भाग आहे. बहुतांश चालक ही वाहने घरी घेऊन जातात. अनेक घंटागाड्या रात्री ११ पर्यंतही शहराच्या कानाकोपºयात फिरताना आढळून येतात. अर्थात, पैसे देण्याच्या बदल्यात अनेक हॉटेलमधील शिल्लक राहिलेल्या खाद्यपदार्थांची विल्हेवाट लावली जाते. काही वाहन चालक डुकरांचा व्यवसाय (वराह पालन) करणाऱ्यांना खाद्यपदार्थ पुरवित असल्याची माहिती आहे.

Web Title: Millions of spent on garbage vehcles and tractor fuel; The problem persists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.