एमआयएमने दिली १६ जणांना उमेदवारी

By Admin | Published: February 4, 2017 02:32 AM2017-02-04T02:32:08+5:302017-02-04T02:34:26+5:30

एमआयएमने अकोला शहरातील ठरावीक प्रभागांमध्येच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

MIM nominated 16 candidates | एमआयएमने दिली १६ जणांना उमेदवारी

एमआयएमने दिली १६ जणांना उमेदवारी

googlenewsNext

अकोला, दि. 0४- एआयएमआयएमने गुरुवारी रात्री उशिरापर्यंंत उमेदवारांच्या नावांवर चर्चा करून शुक्रवारी सकाळी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. एमआयएमने शहरातील ठरावीक प्रभागांमध्येच निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, १६ जणांना उमेदवारी दिली. यात पाच माजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.
एमआयएम हा पक्ष अकोला मनपा निवडणुकीत प्रथमच नशीब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरला आहे. कोणत्या प्रभागांमध्ये निवडणूक लढवावी आणि सक्षम उमेदवाराला उमेदवारी देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी एमआयएमने हैदराबाद व नांदेड येथून चमू पाठविली होती. या चमूने सर्वेक्षण केल्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. एआयएमआयएमने सात प्रभागांमध्ये निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी १६ जणांना उमेदवारी दिली आहेत. उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्यांमध्ये प्रभाग एकमधून डॉ. शफीक अहेमद रफिक, बानोबी सालार खान, वहिदा परवीन गुलाब खान, हक अमीरूल हक अ. सत्तार, प्रभाग क्रमांक दोनमधून राजरत्न गायकवाड, अ. अन्सार अ. जब्बार, प्रभाग क्रमांक ११ मधून माजी नगरसेविका सहराखातुन अब्बास खान तडवी, माजी नगरसेविका मेहरून्निसा शेख अनलहक कुरेशी, प्रभाग १७ मधून रुकय्याबी हबीब खान, प्रभाग १६ मधून माजी नगरसेविका शमीम बी शेख रफिक कुरेशी, प्रभाग १४ मधून नर्गिस परवीन अ. नासिर, मोगल ताजुद्दीन शेख अनलहक आणि प्रभाग क्रमांक नऊमधून माजी नगरसेवक मो. मुस्तफा मो. युसूफ, मो. इलियास अ. गफ्फार, शमीम परवीन कलीम खान, प्रभाग १८ मधून शाहिस्ता परवीन शेख अबरार यांचा समावेश आहे.

Web Title: MIM nominated 16 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.