एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 02:53 PM2018-10-03T14:53:18+5:302018-10-05T14:23:04+5:30

भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली.

 MIM's ideology is not acceptable - MP Raju Shetty | एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी 

एमआयएमचा जहाल विचार मान्य नाही - खासदार राजु शेट्टी 

Next

अकोला: स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणारी जिवंत चळवळ आहे. या चळवळीची विचारधारा ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. आपले संविधान हे कुठल्याही जहाल विचारांना स्विकारत नाही. त्यामुळे भाजपा सोबत जातांना आम्हाला भाजपाचा जहाल विचार कधीही मान्य नव्हताच शेतकरी हिताच्या मुद्यावर त्यांना साथ दिली. तीच भूमिका एमआयएम सोबतची राहिल. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी बाबत ६ आॅक्टोबरला चर्चा आहे त्या चर्चेमध्ये भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे मात्र त्याचा अर्थ एमआयएमचा जहाल विचार आम्हाला मान्य आहे असा होत नाही अशी स्पष्ट भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी मांडली. कापूस सोयाबीन परिषदांच्या निमित्ताने विदर्भ दौºयावर असलेल्या खा. राजु शेट्टी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाºयांसोबत त्यांनी संवाद साधला.


भाजपा सरकारने शेतकºयांच्या विश्वासघात केला आहे. सध्या सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे. त्यामुळे भाजपाला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन व्यापक आघाडी निर्माण करावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सध्या चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. अ‍ॅड.आंबेडकर यांची एमआयएम सोबत मैत्री जाहिर झाली आहे. त्याचा कुठलाही परिणाम या चर्चेवर होणार नाही. मुळातच भाजपाच्या विरोधात व्यापक आघाडी करायची असेल तर सर्वच पक्षांना त्याचे कडवे व जहाल विचार बाजुला ठेवून किमान समान कार्यक्रमावर एक त्र यावे लागेल. त्याच दृष्टीने अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर हे उपस्थित होते.
 
महात्मा गांधीचा जप करणारे मोदी हे हिटलरच
महात्मा गांधींचे नाव घेऊन देशभर स्वच्छतेचा जागर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात हिटलरच आहे अशी टीका खा.राजु शेटटी यांनी केली. देशाची वाटचाल सध्या एक पक्षीय अशी होत आहे हे लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान, धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे असे ज्यांना वाटते त्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. असे ते म्हणाले.

Web Title:  MIM's ideology is not acceptable - MP Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.