पेट्रोल दरवाढीविरोधात एमआयएमचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:39+5:302021-06-21T04:14:39+5:30
ओबीसी संघर्ष समितीचे निवेदन पातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे ...
ओबीसी संघर्ष समितीचे निवेदन
पातूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे. ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून, ओबीसींची जनगणना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे ओबीसी संघर्ष समितीने तहसीलदारांकडे केली आहे. यावेळी सुरेंद्र उगले, राजू उगले, सागर कढोणे, अंबादास देवकर, प्रदीप काळपांडे, मंगेश गाडगे, अजिंक्य निमकंडे उपस्थित होते.
एसटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत
मूर्तिजापूर : कोरोनाकाळात प्रवाशांना सेवा देणारे एसटी कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. शासनाने ६०० कोटी रुपये देऊनही कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची मागणी एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर. के. वरघट, डेपो सचिव आर. पी. गवई यांनी केली आहे.
तीन गोवंशांची सुटका
बाळापूर : गुरांना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनाला बाळापूर पोलिसांनी शनिवारी दुपारी पकडले. एका वाहनातून (क्र. एमएच २८ एच ७३२१) पोलिसांनी तीन गुरे जप्त केली. पोलिसांनी चालक शेख यामीन शेख हमीद (५० रा. नांदुरा), शोएब नवाज जाकीर हुसैन(२२ रा. बाळापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मूर्तिजापुरात खत, बियाणांचा तुटवडा
मूर्तिजापूर : तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणे व खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्याला तातडीने सोयाबीन बियाणे व खतांचा पुरवठा करावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे विधानसभा प्रमुख राजकुमार नाचणे यांनी शनिवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी तालुकाप्रमुख संतोष इंगोले, अमोल वानखडे, तुषार भुयार, भास्कर खोत, विवेक बांबल, सागर पुंडकर उपस्थित होते.
अल्पवयीन मुलीस पळविले
मूर्तिजापूर : रोहिदासनगरातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना १८ जून रोजी घडली. मुलीस सिंदी येथील आकाश इंगळे याने पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या आईने तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बोर्डी नदीपात्राची पाहणी
पातूर : येथील बोर्डी नदीपात्रात काटेरी झाडे वाढली असून, केरकचरा, गाळ साचला आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. नदीपात्राची सफाई करण्याची गरज आहे. मुख्याधिकारी सोनाली यादव, आरोग्य पर्यवेक्षक महेश राठोड, आरोग्य सभापती राजू उगले, सचिन सुरवाडे यांनी शनिवारी नदीपात्राची पाहणी केली.
सोयाबीन बीजप्रक्रिया मार्गदर्शन
अकोट : शहरातील जय भोलेनाथ शेतकरी उत्पादक गट व कृषी अधिकाऱ्यांच्या वतीने शनिवारी नंदीपेठ येथे साेयाबीन बीजप्रक्रिया व कृषीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी शिंदे, भारसाकळे, मोगरे, अडाणी, गटाचे अध्यक्ष प्रवीण हुसे, उपाध्यक्ष मयूर निमकर, सचिव पवन चिखले आदी उपस्थित होते.