खदानीमुळे रहिवाशांना धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:19+5:302020-12-25T04:15:19+5:30

शहरात पार्किंगचा बाेजवारा अकाेला : बाजारपेठेत किंवा शासकीय कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना दुचाकी, चारचाकी वाहन ठेवण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नसल्याने ...

The mine burns the residents | खदानीमुळे रहिवाशांना धाेका

खदानीमुळे रहिवाशांना धाेका

Next

शहरात पार्किंगचा बाेजवारा

अकाेला : बाजारपेठेत किंवा शासकीय कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना दुचाकी, चारचाकी वाहन ठेवण्यासाठी वाहनतळ उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. नाईलाजाने वाहनचालकांना त्यांची वाहने मुख्य रस्त्यालगत उभी करावी लागत असून, वाहतूक शाखा पाेलिसांकडून कारवाई केली जात आहे.

मनपा आवारात जप्त साहित्य बेवारस

अकाेला : महापालिकेच्या विद्युत व अतिक्रमण विभागाने जप्त केलेले साहित्य मनपाच्या आवारात ठेवण्यात आले. यामध्ये फायबर ऑप्टिक केबल, विद्युत वायर, लघु व्यावसायिकांच्या हातगाड्या आदी साहित्यांचा समावेश आहे. जप्त केलेले साहित्य मागील अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असून, त्याची सुरक्षा रामभराेसे असल्याचे चित्र आहे.

स्वच्छतागृहांमध्ये सुविधाच नाहीत !

अकाेला : महापालिकेतील पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असले तरी त्यामध्ये सुविधांचा अभाव आहे. हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी नसून अस्वच्छता असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाने तातडीने स्वच्छतागृहांमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.

मनपात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

अकाेला : काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशास्थितीत मनपाकडून अकाेलेकरांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात असतानाच खुद्द मनपाच्या विविध कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगला खाे दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

क्षयराेग विभागाची सुरक्षा रामभराेसे

अकाेला : शहरात महापालिकेच्या अखत्यारित मुख्य पाेस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या क्षयराेग विभागाची सुरक्षा रामभराेसे असल्याचे समाेर आले आहे. आवारभिंतीला प्रवेशद्वार नसल्यामुळे ऑटाेचालक, रिक्षाचालक व अनेकदा भिकाऱ्यांचा या परिसरात वावर दिसून येताे. याठिकाणी मनपाने चाैकीदार नियुक्त करण्याची नितांत गरज आहे.

सिमेंट रस्त्याची चाळण

अकाेला : शहरातील सर्वांत वर्दळीचा असलेल्या मुख्य पाेस्ट ऑफिस ते सिव्हिल लाइन चाैकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याची अवघ्या सहा महिन्यांत खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. हा रस्ता निकृष्ट व दर्जाहिन असून, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी अकाेलेकर करीत आहेत. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असले तरीही याकडे मनपाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हाेत आहे.

सर्व्हिसराेडच्या दुरुस्तीला ठेंगा

अकाेला : शहरात माेठा गाजावाजा करीत उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली. परंतु पुलाच्या दाेन्ही बाजूंच्या रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असताना कंत्राटदाराने सपशेल दुर्लक्ष केले आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, अकाेलेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: The mine burns the residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.