किमान तापमानात झाली वाढ; रस्त्यावर शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:24 PM2019-04-02T14:24:58+5:302019-04-02T14:26:15+5:30
अकोला: शहराच्या तापमानात मार्च संपल्यानंतर लक्षणीय वाढ झाली असून, मे हिटचा तडाखा जाणवू लागल्याने अकोलेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे.
अकोला: शहराच्या तापमानात मार्च संपल्यानंतर लक्षणीय वाढ झाली असून, मे हिटचा तडाखा जाणवू लागल्याने अकोलेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली आहे. रविवारपासून किमान तापमानात वाढ झाली. १४ ते १८ असणारे हे तापमान २४ ते २५ अंशावर गेले. अकोलेकरांना तापमान नवे नाही. तथापि, यावर्षी मार्च महिन्यातच कमाल उन्हाचा पारा ४३ अंशावर गेला. देशात सध्या निवडणुकीच्या प्रचाराने आधीच वातावरण तापले असताना आता अकोला शहराच्या तापमानाने या आठवड्यात ४१ ते ४४ अंशाचा पारा ओलांडला आहे. हे तापमान एप्रिल-मेमध्ये ४५ आकडा ओलांडेल असा अंदाज आहे. दरम्यान, उन्हाचा पारा वाढल्याले सोमवारी दुपारी रस्त्यावर शुकशुकाट होता.
वाढत्या तापमानामुळे सकाळी-दुपारी उष्णतेच्या तीव्र झळा लागू लागल्याने नागरिक घराबाहेर पडणे आता टाळत आहेत; मात्र तरीही कामधंदे, महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणे जरुरी आहे. मागील दहा दिवसात शहराच्या तपमानाचा पारा ३८ अंशावरून पुढे जात ४३ अंशावर गेला. तर मागील आठवड्यात वातावरणात काही प्रमाणात बदल झाला होता. त्यावेळी अकोला शहरासह जिल्हा, वºहाडात काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तापमानात थोडी फार घटदेखील झाली होती.
दरम्यान, आता पुन्हा तापमानाचा पारा या तीन दिवसात पुन्हा वर चढत असून, तापमानाने ४३ ते ४४ वर पोहोचला आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाचे चटके व झळा जाणू लागल्या आहेत आणि या असह्य झळांपासून संरक्षणासाठी शेतीची मशागतीची कामे करणारे शेतकरी डोक्यात शेले, टोप्या व अकोलेकरही गॉगल्स, डोक्याला शेले, रूमाल बांधण्यासाठीची मागणी वाढली आहे.