अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन; विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 12:44 PM2020-02-16T12:44:09+5:302020-02-16T12:44:16+5:30
आदिवासीच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विनापरवानगी ‘स्टोन के्रशर’यूनिटची उभारणी करण्यात आली आहे.
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गाजीपूर शिवारात एका आदिवासीच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विनापरवानगी ‘स्टोन के्रशर’यूनिटची उभारणी करण्यात आली आहे. यासंदर्भात कारवाई करण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अकोट तालुक्यात गाजीपूर येथील सर्व्हे नंबर १५ व २७ मधील विलास कालू चिमोटे या आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीवर अकोट येथील संतोष चांडक यांनी विनापरवानगी अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन करून सर्व्हे नंबर ३८ मधील जमिनीवर विनापरवानगी ‘स्टोन क्रेशर’ युनिट उभारण्यात आल्याची तक्रार पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे प्राप्त झाली. त्यानुषंगाने यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश २ फेबु्रवारी रोजी पालकमंत्र्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना दिला. त्यानुसार अकोट तालुक्यातील गाजीपूर येथे एका आदिवासी शेतकºयाच्या जमिनीवर अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विना परवानगी उभारण्यात आलेल्या ‘स्टोन के्रशर ’ युनिटची चौकशी जिल्हा खनिकर्म विभागामार्फत ४ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आली आहे.
१२.५० लाखाच्या दंडाची रक्कम वसूल करण्याचे तहसीलदारांना निर्देश!
अकोट तालुक्यातील गाजीपूर येथील अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन करताना एक पोकलेन व दोन डम्पर जप्त करून संतोष चांडक यांना १२ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाºयांमार्फत गत २ आॅगस्ट २०१९ रोजी करण्यात आली होती. या दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड यांनी ४ फेबु्रवारी रोजी अकोट तहसीलदारांना पत्राद्वारे दिले. दंडाची रक्कम जमा न केल्यास दंडाच्या रकमेचा बोजा संबंधितांच्या सात-बारावर चढविण्याच्या सूचनाही तहसीलदारांना देण्यात आल्या.
‘डीजीपीएस’ यंत्राद्वारे होणार खदानीच्या उत्खननाची तपासणी !
गाजीपूर येथील अवैध खदानीतून गौण खणिजाच्या उत्खननाची तपासणी नागपूर येथील खनिकर्म संचालनालयामार्फत ‘डीजीपीएस’ यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी तांत्रिक चमूसह ‘डीजीपीएस’ यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा खनिकर्म अधिकाºयांमार्फत नागपूर येथील खनिकर्म संचालनालयाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे. ‘डीजीपीएस’ यंत्राद्वारे होणाºया तपासणीत खदानीच्या अवैध उत्खननाची वास्तविकता स्पष्ट होणार आहे.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अकोट तालुक्यातील गाजीपूर येथील अवैध खदानीतून गौण खणिजाचे उत्खनन आणि विना परवानगी उभारण्यात आलेल्या ‘स्टोन क्रेशर’ युनिटची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
-डॉ.अतुल दोड
जिल्हा खनिकर्म अधिकारी.