विकास कामांच्या दर्जाबाबत पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:49 AM2017-10-04T01:49:44+5:302017-10-04T01:50:03+5:30
अकोला: नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यात दुचाकीवर फिरून विकास कामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसह ठेकेदारांचीही कानउघाडणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, उपविभागीय अभियंता राम पटोकार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश अलिमचंदाणी हे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मंगळवारी सकाळी अकोल्यात दुचाकीवर फिरून विकास कामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसह ठेकेदारांचीही कानउघाडणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण, उपविभागीय अभियंता राम पटोकार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश अलिमचंदाणी हे उपस्थित होते.
अकोल्यात सध्या मोठय़ा प्रमाणात विकास कामे सुरू असून, या कामांचा दर्जा चांगला राहावा व सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत म्हणून पालकमंत्र्यांनी यापूर्वीही अनेकदा निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, यासोबत काही कामांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीमधील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सकाळी दहा वाजेपासूनच मोटारसायकलने पाहणी सुरू केली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अशोक वाटिका ते सरकारी बगिचा येथील रस्ता, गोरक्षण रोड आदींचा यात समावेश आहे. रस्त्यांची कामे दर्जेदार व मानकानुसार करण्यात येत आहे की नाही, याची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणार्या १५ कोटींच्या सांस्कृतिक भवनाच्या कामांवर कुठलाही फलक नसल्यामुळे कामाचा कालवधी, निधी, कधी पूर्ण होणार, ठेकेदार कोण, याबाबत सामान्य नागरिकांना माहिती कशी मिळणार, अशी विचारणा करून त्यांनी अधिकार्यांची कानउघाडणी केली.
पुढील दोन महिन्यात हे भवन पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. प्र त्यक्षात मात्र कामाची संथ गती पाहून पालकमंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत सर्व यंत्रणांना धारेवर धरले. असाच प्रकार अशोक वाटिका ते सरकारी बगिच्या कार्यालयाच्या पर्यंतच्या रस् त्याबाबत सुरू आहे. कामाचा दर्जा व संथ गतीबद्दल पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना धारेवर धरले.
कामाच्या ठिकाणी दर्शनी भागावर कामाची किंमत व पूर्ण करण्याची मुदत तसेच कंत्राटदार आदींची माहिती असावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. गोरक्षण रोडवरील बॉटलनेकमुळे सुमारे ४00 मीटरच्या रस्त्यांची कामे प्रलंबित आहे, त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. याबाबत येणार्या अडचणींवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला भेट दिली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री यांची उपस्थिती हो ती. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यालय प्रशस्त जागेत शेतकर्यांच्या सोयीच्या दृष्टीने नवीन जागेत स्थलांतरित करण्यात यावे व कार्यालयीन स्वच्छता याबाबत निर्देश कृषी अधिकार्यांना दिले त.
सांस्कृतिक सभागृहाचे काम मार्चपर्यंत होणार
क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत जिल्हय़ात क्रीडा संकुल येथे सर्वांगसुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे. या ठिकाणी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली व संबंधित कंत्राटदाराला काम मुद तीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. सदर काम मार्च २0१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हय़ा तील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा. त्यांना व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक सभागृहाचे निर्माण करण्यात आले आहे. नागरिकांना पुढील वर्षी एक सुसज्ज सभागृह मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांची उपस्थिती होती.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासंबंधी मंत्रालयीन पातळीवर बैठक घेणार!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. निवासी वैद्यकीय वसतिगृह तसेच २१0 खाटांच्या बेड वॉर्डाच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केली. काम दर्जेदार व्हावे व दिलेल्या निकषाप्रमाणे पूर्ण व्हावे, यासाठी कंत्राटदार व संबंधित विभागाच्या अधिकार्यांना सूचना दिल्यात. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या वसतिगृहाला भेट देऊन संबंधितांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. वैद्यकीय अधिकार्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी संबंधित अधिकार्यांना निर्देश दिलेत. तसेच प्रलंबित कामासाठी मंत्रालयीन पातळीवर बैठक घेणार असल्याचे सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अंतर्गत रस्ते, बगिचा तसेच विभागाचे दिशा दर्शविणारे फलक तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाची कमान तयार करण्याचे संबंधित विभागांना निर्देश दिलेत. परिसरातील स्वच्छता व साफसफाईसाठी विशेष लक्ष देण्यास यावे, यासंबंधी कंत्राटी पद्धतीने गरज भासल्यास सफाई कामगार नेमण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समस्या तसेच विकास कामाबद्दल मंत्रालयीन स्तरावर बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. घोरपडे व प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख उपस्थित होते.