उत्तर प्रदेशातील अकोनाऐवजी अल्पवयीन मुलगा पोहोचला अकोल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 06:39 PM2018-04-30T18:39:34+5:302018-04-30T18:39:34+5:30
अकोला - उत्तर प्रदेशातील अकोना या गावातील एक १० वर्षांचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये त्याच्या काकाकडे कामाला होता, मात्र या मुलाला काकाकडे राहायचे नसल्याने त्याने तेथून न सांगता पळ काढून नागरिकांना मदत मागीतली.
अकोला - उत्तर प्रदेशातील अकोना या गावातील एक १० वर्षांचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये त्याच्या काकाकडे कामाला होता, मात्र या मुलाला काकाकडे राहायचे नसल्याने त्याने तेथून न सांगता पळ काढून नागरिकांना मदत मागीतली. नागरिकांनी त्याला अकोनाऐवजी महाराष्ट्रातील अकोल्याचे रेल्वेचे टीकीट काढून दिल्याने तो थेट अकोल्यात पोहोचला. संजय यादव नामक हा मुलगा रेल्वे पटरीवर फीरत असताना त्याला सिव्हील लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेउन माहिती घेतली. त्यानंतर त्याच्यासोबतच घडलेला प्रकार समोर आला . संजय यादव गुजरातमध्ये काकाकडे कामाला गेला होता, काकाकडे राहायचे नसल्याने तो तेथून न सांगताच निघाला व उत्तर प्रदेशातील अकोना गावाला जायसाठी गुजरातमधील नागरिकांन मदत मागीतली. रेल्वेचे अकोल्याचे टीकीट काढून दिले, याच परिसरात अमरावती गाव असून तो रेल्वे पटरीने न्यु तापडीया नगर परिसरात जात असतांना त्याला पोलिसांनी हटकले. काही नागरिक त्याला अमरावतीसाठी जाणाऱ्या ट्रकमध्ये पाठविण्याचे तयारी करीत होते. सिव्हील लाईन्स पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन त्याच्या आई-वडीलांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला बालसुधार गृहात पाठवीले. दोन दिवसांनी त्याचे आई-वडील येणार असून त्यानंतर त्याला पुर्ण प्रक्रीया करून आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.