अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर राजस्थानात लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:42 AM2019-08-01T11:42:50+5:302019-08-01T11:42:58+5:30

अकोला : जुने शहरातील पोळा चौक परिसरातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला राजस्थान येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली.

Minor girl of Akola Sexually abused in Rajasthan | अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर राजस्थानात लैंगिक अत्याचार

अकोल्यातील अल्पवयीन मुलीवर राजस्थानात लैंगिक अत्याचार

Next

अकोला : जुने शहरातील पोळा चौक परिसरातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला राजस्थान येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, डाबकी रोड येथील महिलेने तक्रार दिली, की तिची १४ वर्षीय मुलगी ही ६ जुलै रोजी घरून न सांगता निघून गेली होती. त्यांनी नातेवाइकांकडे मुलीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. दरम्यान, २४ जुलै रोजी पिडीतेच्या मावशीच्या फोनवर रतन नावाच्या व्यक्तीने फोन करून तुमची मुलगी गुºहाडीया इसर जिल्हा जलावट, राजस्थान येथे माझ्या घरी असून, तिचे माझ्यासोबत विक्रम नावाच्या व्यक्तीने लग्न लावून दिल्याचे सांगितले. लग्नाच्या वेळी अकोल्यातील प्रतीक बनकर व स्वप्निल गवई (रा. शिवसेना वसाहत) हजर असल्याचे त्याने सांगितले. यानंतर मुलीची आई, पती व बहीण व तिचा पती यांच्यासोबत २७ जुलै रोजी राजस्थानातील गुºहाडीया इसर गाठले. त्या ठिकाणी त्यांना त्यांची मुलगी आढळून आली. यावेळी मुलीने तिच्या आईला सर्व घटनाक्रम सांगीतला. रतन नावाच्या व्यक्तीसोबत बळजबरीने विवाह लावून देण्यात आला असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीने तिच्या आईला सांगितले. शिवाय, शारीरिक संबंधास नकार दिला असता, रतनने मारझोड करीत कमरेवर चटका दिल्याचेही त्या मुलीने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने मुलीला मंगळवार, ३० जुलै रोजी अकोल्यात आणले. याप्रकरणी मुलीची आई यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३६६ अ, ३७६ (२)(एन), ३२३, ३४ भादंवि सहकलम ३, ४, ७, ८ लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हे दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की रमेश कदम, स्वप्निल गवई, रतनलाल सिसोदीया (रा. मध्य प्रदेश) व जायदाबी मोहम्मद हाशम (रा.शिवणी) या चौघांना बुधवार, ३१ जुलै रोजी अटक केली.

 

Web Title: Minor girl of Akola Sexually abused in Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.