गौण खनिज अवैध वाहतूक; १८ लाखांवर दंड वसूल
By Admin | Published: September 24, 2015 01:39 AM2015-09-24T01:39:03+5:302015-09-24T01:41:59+5:30
पाच महिन्यांतील महसूल विभागाची कारवाई.
अकोला: गौण खनिज अवैध वाहतूक प्रकरणांमध्ये गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात १८ लाख ६६ हजार ९00 रुपयांचा दंड वसुलीची कारवाई महसूल विभागामार्फत करण्यात आली. रेती, मुरुम, दगड, माती इत्यादी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी वाहने पकडून, संबंधित वाहन मालकांकडून दंड वसुलीची कारवाई केली जाते. गत एप्रिल ते ऑगस्ट २0१५ अखेर या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर , बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात गौण खनिज अवैध वाहतुकीच्या १५६ प्रकरणांमध्ये १८ लाख ६६ हजार ९00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सातही तालुक्यात महसूल विभागाच्या अधिकार्यांकडून ही कारवाई करण्यात आली. गतवर्षी लिलाव करण्यात आलेल्या जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत ३0 सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर गौण खनिज अवैध वाहतूक प्रकरणांमध्ये कारवाई आणि दंड वसुलीचे प्रमाण सप्टेंबरनंतर आणखी वाढणार आहे.