अकोला जिल्ह्यात सुरू होणार गौण खनिज ‘चेक नाके’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:58 PM2018-11-10T13:58:11+5:302018-11-10T13:58:36+5:30
अकोला: गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लवकरच तालुकास्तरावर गौण खनिज तपासणी नाके (चेक नाके) सुरू करण्यात येणार आहेत.
- संतोष येलकर
अकोला: गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात लवकरच तालुकास्तरावर गौण खनिज तपासणी नाके (चेक नाके) सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाºयांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.
वाळू, मुरूम, गिट्टी, माती इत्यादी प्रकारच्या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करण्यात येते. गौण खजिनाच्या अवैध वाहतुकीमुळे स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाचा महसूल बुडतो. त्यानुषंगाने गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील तालुकास्तरावर गौण खनिज ‘चेक नाके’ सुरू करण्याची तयारी महसूल प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये लवकरच जिल्ह्यातील अकोट व बाळापूर येथे ‘चेक नाका’ सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील उर्वरित पाच तालुक्यातही गौण खनिज ‘चेक नाके’ सुरू करण्याचे नियोजन महसूल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
‘नाक्या’वर अशी होणार तपासणी!
‘चेक नाक्या’वर येणाºया प्रत्येक गौण खनिजाच्या वाहनाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये गौण खनिजाच्या वाहतूक पासची नोंदणी केल्यानंतर ती वाहतूक पास रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वाहतूक पासवर एकापेक्षा जास्त होणाºया गौण खनिजाच्या फेºयांना चाप बसणार आहे.
‘सीसी कॅमेरा’चा राहणार ‘वॉच’!
जिल्ह्यातील गौण खनिज ‘चेक नाक्यां’वर ‘सीसी कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. ‘चेक नाक्या’वर येणाºया प्रत्येक गौण खनिज वाहनाची नोंद झाली की नाही, यासंदर्भात लक्ष (वॉच) ठेवण्यासाठी ‘सीसी कॅमेरा’चा उपयोग होणार आहे. तसेच ‘चेक नाक्या’च्या ठिकाणी शेड आणि बॅरिकेड्स उभारण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकाºयांमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूल कर्मचाºयांसह पोलिसांचीही होणार नेमणूक !
‘चेक नाक्या’वर गौण खनिजाच्या वाहनांची तपासणी करण्यासाठी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच गौण खनिजाच्या ‘चेक नाक्यां’वर पोलीस कर्मचाºयांचीही नेमणूक करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन, ‘चेक नाक्या’वर पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे सुचविले आहे.
गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील तालुकास्तरावर गौण खनिज ‘चेक नाके’ सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपाययोजनेद्वारे गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला चाप बसेल.
- आस्तिककुमार पाण्डेय
जिल्हाधिकारी
जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या संकल्पनेतून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गौण खनिज ‘चेक नाका’ सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- डॉ. अतुल दोड
जिल्हा खनिकर्म अधिकारी