मावश्याने केला अल्पवयीन भाचीवर बलात्कार
By admin | Published: July 1, 2016 02:18 AM2016-07-01T02:18:39+5:302016-07-01T02:18:39+5:30
मावश्याच्या धाकापोटी अकोल्यातून पळ काढलेली भाची गुरुवारी शेगाव रेल्वे पोलिसांना दिसल्यानंतर हा प्रकार उघड झाला
अकोला - खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कैलास टेकडी येथील रहिवासी एका मावश्याने अल्पवयीन भाचीवर बलात्कार केल्याची घटना २0 जुन रोजी घडली. मात्र मावश्याच्या धाकापोटी अकोल्यातून पळ काढलेली भाची गुरुवारी शेगाव रेल्वे पोलिसांना दिसल्यानंतर हा प्रकार उघड झाला असून खदान पोलिसांनी गुरुवारी रात्री सदर इसमाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
कैलास टेकडी येथील रहिवासी तैय्यब अली महेबुब अली (५0) याची अलपवयीन भाची २0 जुन रोजी त्याच्या घरी असतांना त्याने या अल्पवयीन भाचीवर बलात्कार केला. घडलेला प्रकार कुनाला सांगीतला तर तुझी खैर नाही अशी धमकी दिल्याने ही अल्पवयीन मुलगी अकोल्यातून शेगावला गेली. शेगाव रेल्वे स्टेशनवर फीरत असतांना तीच्यावर रेल्वे पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी तीची विचारपुस केली असता तीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगीतला. त्यानंतर ३0 जुलै रोजी शेगाव रेल्वे पोलिस अल्पवयीन मुलीला घेउन अकोल्यात दाखल झाले. घटनास्थळ खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत असल्याने मुलीच्या तक्रारीवरून तैयब अलीविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला.
मुलगी सात दिवस उघडयावर
मावश्याने बलात्कार केल्यानंतर धमकी दिल्याने घाबरलेली मुलगी अकोल्यातून शेगावला गेली. मात्र कुणाचाही आधार नसल्याने मंदिर तसेच रेल्वे स्टेशन परिसरात भिक मागुन तीने भुख भागविली. २१ तारखेपासून ती अशा प्रकारे वास्तव्य करीत असतांनाच ३0 जुन रोजी शेगाव रेल्वे पोलिसांना दिसल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
रेल्वे पोलिसांची तत्परता
रेल्वे पोलिसांना ही मुलगी दिसल्यानंतर त्यांनी विचारपुस करून ती अडचणीत असल्याची तत्परता दाखवीली. त्यामूळे मुलीवर झालेल्या अतिप्रसंगाची वाच्यता झाली. रेल्वे पोलिसांनी मुलीची विचारपुस केली नसती तर घडलेला प्रकार ही अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता अशाच प्रकारे सहन करीत राहीली असती तर तीच्या आयुष्याची राखरांगोळी झाली असती. मात्र रेल्वे पोलिसांनी दक्षता घेत या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केला.