मुलीवर बलात्कार करणारा पोलीस गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:40 AM2017-08-07T02:40:01+5:302017-08-07T02:40:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आॅक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत बळजबरीने बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला. सदर अल्पवयीन मुलीने तिच्या सोबत घडलेल्या या घटनेची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी संदीप आनंद गवई या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
गीता नगरातील रहिवासी पोलीस कर्मचारी संदीप गवई याने केलेल्या कुकृत्याची तत्काळ दखल घेत जुने शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब घुगे यांनी त्याला अटक केली. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, संदीप गवई याने २०१६ च्या दसºयाच्या दिवशी घरी बोलावले. व मोबाइल नंबर दिला. मला नेहमी फोन करीत राहा, असे म्हटले. जर तू फोन केला नाही, तर तुझ्या आईला व भावाला मारून टाकीन, अशी धमकीही दिली. तेव्हापासून तो सतत बोलत असे . दिवाळीनंतर आई मामाच्या घरी गेल्यानंतर त्याने घरी कुणी नसल्याचे पाहून बोलावले व बलात्कार केला. त्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा त्याने बलात्कार केला. मी शाळेत जायची, तेव्हा तो पाठलाग करायचा व जवळ करण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र त्याला टाळण्याचा प्रयत्न करायची. दरम्यान,४ जुलै रोजी आरोपीने रात्री आई घरी असताना त्यांने मला आवाज दिला. एवढ्या रात्री कशाला हाक मारली म्हणून आईने विचारले असता, मी आजपर्यंतचा घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनतर तिने मुलीला घेऊन जुने शहर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी गवई या आरोपीविरुद्ध भादंवि ३७६, ३५४ (ड) ५०६ सहकलम ४ पास्कोनुसार गुन्हा दाखल केला.
खाकीतील रक्षक बनला भक्षक!
स्वत:च्या मुलीच्या वयाच्या असलेल्या मुलीवर बलात्कार करणारा हा खाकी वर्दीतील संदीप गवई भक्षक बनल्याच्या प्रतिक्रिया पोलीस ठाण्यात उमटल्या. मुलीला पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. पोलिसाच्या दहशतीने मुलीच्या मनात प्रचंड भीती असल्याचे दिसून आले.