मिनिटांचे आंदाेलन अन् घंटाभर फाेटाेसेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:52+5:302021-06-28T04:14:52+5:30
अहाे आधी ओबीसींना तर बाेलू द्या भारतीय जनता पक्षाने ओबीसी आरक्षण रद्द हाेण्याचा अनुषंगाने महाविकास आघाडीला दाेषी ठरवीत शनिवारी ...
अहाे आधी ओबीसींना तर बाेलू द्या
भारतीय जनता पक्षाने ओबीसी आरक्षण रद्द हाेण्याचा अनुषंगाने महाविकास आघाडीला दाेषी ठरवीत शनिवारी रास्ता राेकाे आंदाेलन केले. आंदाेलनाच्या स्थळी पक्षाची भूमिका मांडणारे भाषणे झाली. साहजिकच सूत्रसंचालन प्रवक्त्यांकडे हाेते. त्यांनी भाषणासाठी नावे पुकारण्यास सुरुवात केल्यावर एका नावाभाेवती त्यांची गाडी वारंवार अडकत हाेती. अखेर नेत्यांना हस्तक्षेप करून अहाे ते नंतर बाेलतील असे जाहीरपणे सांगत आधी ओबीसी नेत्यांना बाेलू द्या असा अप्रत्यक्षच सल्ला दिल्यावर मग भाषणांची गाडी सुरळीत झाली.
...................
शिवसेनेत जिल्हाप्रमुख बदलाची खदखद
शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांची राजकीय गाडी सध्या सुसाट आहे. विकासनिधी असाे की प्रलंबित प्रश्नांची तड लावणे असाे, बाप्पू काेणाच्याही हाताला लागत नाहीत. त्यामुळे सेनेत आधीच असलेल्या दाेन गटांत सध्या कुरघाेडीचे शीतयुद्ध् चांगलेच गरम झाले आहे. जिल्हाप्रमुखच आमदार आहेत त्यामुळे नवे जिल्हाप्रमुख द्यावे यासाठी आता जाेर बैठका अन् दाैरे सुरू आहेत. शिष्टमंडाळाची शिवसेना भवनाला प्रदक्षिणाही झाली त्यामुळे जिल्हाप्रमुख खरंच बदलेले का? अशी चर्चा सेनेत सुरू झाली आहे. मात्र, सध्याचे राजकीय वारे पाहता बाप्पूंना सब भूमी ‘गाेपाल’ की व्हावी असे वाटणे साहजिकच आहे. शिवाय वाऱ्याची दिशा ओळखण्यात ते वाकबगार आहेत त्यामुळे वारे काेणाच्या बाजूने वर पुढील युद्धाची रंगत ठरणार आहे.