दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:32+5:302020-12-22T04:18:32+5:30

अकाेला : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांची माहिती हाेण्यासाठी दाेन्ही बाजूला असलेल्या आरशांचा वापर याेग्य त्या ...

The mirror of the bike is only for combing the hair | दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच

Next

अकाेला : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांची माहिती हाेण्यासाठी दाेन्ही बाजूला असलेल्या आरशांचा वापर याेग्य त्या कारणासाठी हाेत नसल्याची माहिती आहे. या आरशाचा वापर बहुतांश दुचाकीचालक केस विंचरण्यासाठीच करीत असल्याची माहिती समाेर आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्ग या रस्त्यांवरून वाहन चालविताना दुचाकीला दाेन्ही बाजूचे आरसे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या आजूबाजूच्या वाहनांची माहिती दुचाकी चालकाला हाेते. यासाेबतच दाेन्ही बाजूला वळतानाही या आरशांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र बहुतांश वाहन चालक या आरशांचा वापर न करता पाठीमागे वळून पाहतात आणि नेमके याचवेळी अपघात घडत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुचाकीला दाेन्ही बाजूला असलेले आरसे हे महत्त्वाचे असून त्याचा उपयाेगही याेग्य ठिकाणी करणे गरजेचे असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आरसा नसल्यास दंडाची तरतूद

दुचाकीला आरसा नसल्यास पाेलीस कायद्यात ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे; मात्र अनेक दुचाकीचालक आरसे काढून ठेवतात तर काहीजण केवळ केस विंचरण्यापुरताच या आरशाचा उपयाेग करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पाेलिसांकडून कारवाई करण्याची गरज आहे.

दुचाकीचालकांना हे बंधनकारक

दुचाकीचालकांना दुचाकीचा आरसा बंधनकारक आहे. यासाेबतच दुचाकी चालविण्याचा परवाना व कागदपत्रे ठेवणे गरजेचे आहे. यासाेबतच हेल्मेट व प्रदूषण नियंत्रणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे; मात्र अनेक दुचाकीचालक कागदपत्र बाळगत नसल्याचे दिसून येते. अशा दुचाकींवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

शहरातील दुचाकींची संख्या

तीन लाख ५० हजारांच्या आसपास

Web Title: The mirror of the bike is only for combing the hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.