चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 06:35 PM2018-11-24T18:35:12+5:302018-11-24T18:37:27+5:30

युवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले.

  Misconceptions made by the people with wrong cultural nationalism - Javed Pasha | चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा 

चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून युवकांची दिशाभूल - जावेद पाशा 

Next
ठळक मुद्देसहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.या संमेलनात गोपाल सालोडकर व संच यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन गित सादर केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.

अकोला: देश स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समर्पक विचारांचा बलशाली भारत होईल आणि युवकांच्या सृजनशीलतेला, कल्पकतेला, नवनिर्माण शक्तीला चालना देणारी राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व्यवस्था मिळेल. अशी अपेक्षा होती. परंतु त्याऐवजी युवकांच्या हाती बेकारी, विचलितताच आली. युवकांसमोर चूकीचा सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडून दिशाभूल करण्यात येत आहे आणि हिंदू-मुस्लिम संघर्ष, धार्मिक तेढ रूजविली आहे. त्यामुळे युवकांनी जागरूक होण्याची गरज असल्याचे मत जावेद पाशा कुरेशी यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने ५0 व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी प्रित्यर्थ सहावे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे होते. विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख अतिथी म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी, ज्येष्ठ ग्रामगीता प्रचारक डॉ. भास्करराव विघे, धर्मदाय उपायुक्त के.व्ही. मसने, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, डॉ. गजानन नारे, ज्ञानेश्वर रक्षक, कृष्णा अंधारे, प्रा. संतोष हुशे, पत्रकार पुरुषोत्तम आवारे, अ‍ॅड. सुधाकर खुमकर, ज्येष्ट नाट्यकर्मी अशोक ढेरे, सुभाष मिरजकर, निशा सोनवणे, राष्ट्रसंत जन्मस्थळ यावलीचे अध्यक्ष सुनील देशमुख, शेतकरी नेते भाई प्रदीप देशमुख, अ‍ॅड. रामसिंग राजपूत, हभप नामदेव महाराज गव्हाळे, चोरोडे गुरुजी, नगरसेवक धनंजय धबाले, रयत संघटनेचे राहुल कडू, प्रवीण भोटकर आदी होते. या संमेलनात गोपाल सालोडकर व संच यांनी राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन गित सादर केले.
जावेद पाशा म्हणाले, युवकांनी हिंदू-मुस्लिम संघर्षाचे खरे गौडबंगाल लक्षात घ्यावे. हिंदू-मुस्लिमामधील धर्मांध व सत्ताधाऱ्यांचे सत्तासंतुलन व मक्तेदारीचे षडयंत्र हे सांस्कृतिक व धार्मिक विद्वेषाच्या वणव्यात किती बहुजनांचे बळी जाणार? फाळणी ते बाबरी रामजन्मभूमि
प्रास्ताविक सेवा समितीचे अध्यक्ष रामेश्वर बरगट यांनी केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले.

 

Web Title:   Misconceptions made by the people with wrong cultural nationalism - Javed Pasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.