बाजार समितीत गैरव्यवहारः अपहार दडपण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:56+5:302021-04-24T04:18:56+5:30

पुंडकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, आपण सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांतच सचिव व रोखपाल यांनी कॅशबुक न लिहिणे, बाकी ...

Misconduct in the market committee: Attempt to suppress embezzlement! | बाजार समितीत गैरव्यवहारः अपहार दडपण्याचा प्रयत्न!

बाजार समितीत गैरव्यवहारः अपहार दडपण्याचा प्रयत्न!

Next

पुंडकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, आपण सभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांतच सचिव व रोखपाल यांनी कॅशबुक न लिहिणे, बाकी हिशेबाची नोंद न करता कामात अनियमितता करणे, कामावर नियमित हजर न राहणे, आदी आरोपाखाली मी व इतर नऊ संचालकांनी बहुमताने सचिव राजकुमार माळवे यांना निलंबित केले होते; परंतु सभापतीपदावरून पायउतार झाल्यानंतर कार्यरत असलेल्या सभापती व सचिव यांनी बाजार समितीमध्ये चार वर्षांपासून प्रत्येक कामात अनियमितता केली. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या दि. ६ एप्रिल रोजी सभेमध्ये बाजार समितीमध्ये झालेल्या अपहाराबाबत संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत आजच्या सभेमध्ये ठराव

घ्यावा, असे लेखी पत्र अतुल म्हैसने, राजकुमार मंगळे व विलास साबळे या तीन संचालकांनी सभापतींना दिले; परंतु अल्पमत असल्यामुळे त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली. बाजार समितीमध्ये अनेक गैरप्रकार झाले असून, सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करताना विशेष लेखापरीक्षक देशपांडे, सचिव

व लेखापाल यांनी संगनमत करून रोखपाल यांच्याकडून तब्बल १८ लाख रुपये परस्पर भरणा करून अपहार दडपण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या दि. ३ मार्च रोजीच्या बाजार समितीच्या सभेमध्ये दोषींवर कार्यवाही करण्याबाबत पाच संचालकांनी लेखी पत्र देऊनही सभापती व काही निवडक संचालकांनी दोषींना पाठीशी घालण्याचे काम केल्याचा आरोप करीत तक्रारीची कोणतीही दखल

घेतली नसल्याची माहिती माजी सभापती गजानन पुंडकर यांनी पत्रकारांना दिली.

Web Title: Misconduct in the market committee: Attempt to suppress embezzlement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.