अकोट तालुक्यात फळबाग योजनामध्ये गैरव्यवहार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:19 AM2021-03-08T04:19:19+5:302021-03-08T04:19:19+5:30
अकोटः महात्मा गांधी रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभामध्ये गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची ...
अकोटः महात्मा गांधी रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभामध्ये गैरव्यवहार झाला असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषिंविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर यांनी तक्रार केली आहे. याप्रकरणात तालुका कृषी अधिकाऱ्यांनी अधिकारी, पर्यवेक्षक अशा १४ जणांचे पथक चौकशी करण्यासाठी नेमले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तालुक्यातील मौजे अकोलखेड, अंबोडा, दहिखेल फुटकर, मोहाळा, पोपटखेड, रुधाळी येथे आधीच लागवड अस्तित्वात
असलेल्या फळबागावर महात्मा गांधी रोजगार हमी योजना, सन २०१८-१९ अणि २०१९-२० अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.
भाऊसाहेब फुडकर फळबाग योजनेंतर्गत प्रत्यक्ष लागवड न केलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ दिला आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून गरीब व गरजू पात्र शेतकऱ्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषिंवर कारवाई करण्याची मागणी कैलास गोंडचर यांनी केली आहे. तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचा लाभ दिला आहे. या कामांची चौकशी करण्यासाठी तालुका स्तरावर पथक नेमण्यात आले आहे. चौकशीकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.