चान्नी-उमरा मार्गाची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:18 AM2020-12-29T04:18:31+5:302020-12-29T04:18:31+5:30
खेट्री: गत काही महिन्यांपासून पातूर तालुक्यातील चान्नी-उमरा मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक ...
खेट्री: गत काही महिन्यांपासून पातूर तालुक्यातील चान्नी-उमरा मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारक व ग्रामस्थांना रस्त्यावरुन प्रवास करताना अडथळा निर्माण होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
काही महिन्यांपासून चान्नी-उमरा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर किरकोळ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अपघातात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रार केली; मात्र अद्याप दखल घेतली नसल्याने या मार्गाची स्थिती ‘जैसे थे’ आहे. बुलडाणा, मेहकर, औरंगाबाद, पुणे येथे जाण्यासाठी चान्नी-उमरा मार्ग सोयीचा असल्याने या मार्गावर दररोज वाहनांची वर्दळ असते. तसेच चान्नी येथे बँक, परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने उमरा, पांगरा, मळसूर आदी ग्रामस्थांना चान्नी येथे ये-जा करावी लागते. त्यामुळे संबंधित विभागाने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (फोटो)