चान्नी ते सस्ती मार्गाची दयनीय अवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:02+5:302021-09-14T04:23:02+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी ते सस्ती मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे डबके साचल्याने वाहनधारक व ...
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी ते सस्ती मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांमुळे डबके साचल्याने वाहनधारक व ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. गत काही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे अनेक वेळा खड्ड्यांमध्ये पडून अनेक अपघातही झाले आहेत. याबाबत पाण्याचे डबके साचल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम तसेच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद विभागाकडे वारंवार तक्रार केली, परंतु संबंधितांकडून अद्यापही दखल घेतली गेली नाही. परिणामी दररोज अपघातात अनेक जण जखमी होत आहे. चान्नी परिसरातील हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. चान्नीजवळील जय बजरंग विद्यालयासमोर मोठमोठे खड्डे पडले असून, खड्ड्यात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. वाडेगाव येथे मोठी बाजारपेठ असल्याने तसेच अकोला, बाळापूर, पातूर जाण्यासाठी हा मार्ग एकमेव असल्याने ग्रामस्थांना याच मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांकडून होत आहे.
---------
दुरुस्तीसाठी लाखो रुपये पाण्यात चान्नी ते सस्ती मार्गाच्या दुरुस्तीसाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले, परंतु कंत्राटदार व संबंधितांच्या मिलीभगतमुळे थातूरमातूर दुरुस्ती करून लाखो रुपये लाटण्यात आल्याचा आरोप होत आहे.
---------------------
चान्नी ते सस्ती मार्गाची अनेक वेळा दुरुस्ती केली; मात्र संबंधित व कंत्राटदार यांच्या मिलीभगतमुळे निकृष्ट साहित्य वापरून देयक लाटले जाते. दुरुस्ती केल्यानंतर महिनाभरातच रस्ता ‘जैसे थे’ होऊन मोठमोठे खड्डे पडतात कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही.
- विलास इंगळे, ग्रामस्थ चान्नी
120921\2328img20210820150804.jpg~120921\2328img20210820150804.jpg
????~????