अकोल्यातून बेपत्ता मुलगी दीड वर्षांनंतर सापडली; अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई

By सचिन राऊत | Published: August 25, 2023 04:22 PM2023-08-25T16:22:08+5:302023-08-25T16:23:08+5:30

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाने केली असून मुलीला त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Missing girl from Akola found after one-and-a-half years; Unethical Human Trafficking Unit Action | अकोल्यातून बेपत्ता मुलगी दीड वर्षांनंतर सापडली; अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई

अकोल्यातून बेपत्ता मुलगी दीड वर्षांनंतर सापडली; अनैतिक मानवी वाहतूक कक्षाची कारवाई

googlenewsNext

अकाेला : खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेली एक अल्पवयीन मुलगी गत दिड वर्षांपासून बेपत्ता असल्याच्या तक्रारीवरून या मुलीचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाने केली असून मुलीला त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

खदान पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका मुलीला पळवून नेल्याची तक्रार खदान पाेलिस ठाण्यात देण्यात आली. बरेच दिवस उलटल्यावरही मुलीचा शाेध लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाने सुरु केल्यानंतर म्ध्यप्रदेशातील खंडवाख, मुंबई व पूणे येथे शाेध घेतला मात्र तीचा पत्ता लागला नाही. त्यानंतर ही मुलगी एका युवकासाेबत त्याच्याच घरात असल्याची माहीती पाेलिसांना मीळाली. यावरुन पाेलिसांनी दाेघांनाही विश्वासात घेउन तिला अकाेल्यात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक संदीप घुगे, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक नियंत्रण कक्षाच्या उज्ज्वला देवकर यांच्या मार्गदर्शनात पाेलिस उपनिरीक्षक विजय खर्चे, सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, पूनम बचे, भावना पाेते, अरविंद खाेडे, संताेष कदम, गाेपाल ठाेंबरे, आशिष आमले यांनी केली.
 

Web Title: Missing girl from Akola found after one-and-a-half years; Unethical Human Trafficking Unit Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.