शिकवणी वर्गातील बेपत्ता विद्यार्थी आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 06:44 PM2018-12-22T18:44:48+5:302018-12-22T18:44:51+5:30
अकोला : अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील रहिवासी जवाद मलीक जमील अहमद हा युवक शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिकवणी वर्गासाठी असून १८ डिसेंबर रोजी अचाणक बेपत्ता झाल्यानंतर तो गुरुवारी बल्लारशाहा येथे रेल्वे पोलिसांना आढळला.
अकोला : अमरावती जिल्हयातील मोर्शी येथील रहिवासी जवाद मलीक जमील अहमद हा युवक शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात शिकवणी वर्गासाठी असून १८ डिसेंबर रोजी अचाणक बेपत्ता झाल्यानंतर तो गुरुवारी बल्लारशाहा येथे रेल्वे पोलिसांना आढळला.
जवाद मलिक जमील अहमद (१९) हा युवक १९ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजता शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर कृषी नगर परिसरातील त्याच्या रुमवर गेला होता. त्यानंतर रुममध्येच रहिवासी असलेल्या दुसऱ्या मित्राला रुग्णालयात जाऊन येतो अशा प्रकारचा मॅसेज केला. मात्र त्यानंतर तो रुमवर परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या मित्राने जावेद बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यांनीही शोध सुरु केला मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. त्यामुळे जवादचे कुटुंबीय अमरावती येथून अकोल्यात आले. त्यांनी या प्रकरणाची माहिती सिव्हील लाईन्स पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरु केला. या विद्यार्थ्याच्या शोधासाठी अमरावतीच्या श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या तपासणीमध्ये विद्यार्थ्याच्या रुमपासून तर महामार्गापर्यंत श्वानाने आणून सोडले होते. तर तपासणी करणाºया पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे जवादच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे अकोला रेल्वे स्टेशन होते. याप्रकरणी तपास केल्यानंतर रेल्वे क्रमांक १२५१५ या एक्सप्रेसमध्ये तो प्रवास करीत असल्याचे आढळल्यानंतर त्याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने बल्लारशाहमध्ये उतरविण्यात आले. त्यास सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून, त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. जावेदमुळे शिकवणी वर्ग संचालक आणि पोलिसांना नाहकच त्रास सहन करावा लागला असून त्याच्या बेपत्ता होण्याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही.