मित्र समाज क्‍लबने केला प्रकाश सावल यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:59+5:302021-04-08T04:18:59+5:30

अत्यावश्यक रेमडेसिवीरची ना नफा ना तोटा दरात विक्री अकोला - कोविड-१९ च्या रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्वत्र ...

Mitra Samaj Club felicitated Prakash Sawal | मित्र समाज क्‍लबने केला प्रकाश सावल यांचा सत्कार

मित्र समाज क्‍लबने केला प्रकाश सावल यांचा सत्कार

Next

अत्यावश्यक रेमडेसिवीरची

ना नफा ना तोटा दरात विक्री

अकोला - कोविड-१९ च्या रुग्णांसाठी संजीवनी ठरत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा सर्वत्र काळाबाजार होत असताना अकोल्यातील श्री दत्त मेडिकलचे संचालक प्रकाश सावंल यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेमेडीसिवर इंजेक्शनची विक्री केल्याने अनेक रुग्णांना त्याचा लाभ होत आहे. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार मित्र समाज क्लबच्या वतीने करण्यात आला.

दत्त मेडिकल्सचे संचालक शिवप्रकाश सावल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते एका खासगी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होते. या दरम्यान कोविड केअर सेंटरकडून रुग्णांची होत असलेली लूट त्यांच्या निदर्शनास आली. यावरून त्यांनी दत्त मेडिकल्समधून कोविडच्या रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री सुरू केली. त्यामुळे हजारो रुग्णांची आर्थिक लूट थांबली. या त्यांच्या दातृत्वामुळे मित्र समाज क्लबचे सदस्य तथा विधान परिषदेचे शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या हस्ते प्रकाश सावल यांचा गौरव करण्यात आला. कोरोना संसर्गित रुग्णांना वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून संपूर्ण राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. सहा इंजेक्शनचा एक डोस असून तो रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. त्यामुळे या इंजेक्‍शनचा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशातच रेमेडीसिवर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याने नागरिकांना तसेच रुग्णांना मरण यातना सहन करावा लागत आहे. या स्थितीत कोरोना योद्धा म्हणून समोर आलेल्या प्रकाश सावल यांनी श्री दत्त मेडिकलवर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला रेमेडीसिवर इंजेक्शन ना नफा ना तोटा या तत्त्वावर विक्री करणे सुरू केले आहे. ही बाब मित्र समाज क्‍लबच्या सदस्यांना कळल्यानंतर त्यांनी कोरोना योद्धा सावल यांचा सत्कार केला. तसेच यावेळी त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मित्र समाज क्लबचे मनोज अग्रवाल, अजय मोहत, ओम प्रकाश सावंल भूपेश मुंदडा उपस्थित होते.

Web Title: Mitra Samaj Club felicitated Prakash Sawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.