एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अकोल्यात संमीश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:37 PM2018-06-08T14:37:35+5:302018-06-08T14:37:35+5:30
अकोला: परिवहनमंत्र्यांनी घोषित केलेली वेतनवाढ अमान्य असल्याचे स्पष्ट करीत एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी संघटनांनी ७ व ८ जून च्या मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला.अकोला विभागात संपाला संमीश्र प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.
अकोला: परिवहनमंत्र्यांनी घोषित केलेली वेतनवाढ अमान्य असल्याचे स्पष्ट करीत एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी संघटनांनी ७ व ८ जून च्या मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकारला. अकोला विभागातील बहुतांश कर्मचारी संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शविला असला तरी, बहतांश कर्मचाºयांमध्ये या संपाबाबत संभ्रमावस्था आहे. परिणामी, अकोला विभागात संपाला संमीश्र प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवार १ जून रोजी एसटी महामंडळ कर्मचाºयांची वेतनवाढ घोषित केली. मात्र, ही वेतनवाढ ३२ ते ४८ टक्के नसून, प्रत्यक्षात १७ ते २0 टक्केच असल्याचे लक्षात आल्याने एसटी महामंडळाच्या राज्यातील सर्व विभागातील कर्मचारी ७ व ८ जूनच्या मध्यरात्रीपासून महामंडळ प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहे. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन वेतनवाढीविरोधात पुकारलेल्या या स्वयंघोषित संपाला अकोला विभागातील मान्यताप्राप्त संघटनेसह अन्य संघटनांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. मात्र बहुतांश कर्मचाºयांमध्ये संपाबाबत संभ्रमावस्था असल्यामुळे विभागात संपाला संमीश्र प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता विभागातील वाशिम, मंगरुळपीर व मुर्तिजापूर या ठिकाणी शंभर टक्के बंद असल्याची माहिती मान्यताप्राप्त संघटनेसह अन्य संघटनेच्या पदाधिकाºयांनी ‘लोकमत’ला दिली.