‘भारत बंद’ला मूर्तिजापुरात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:42+5:302020-12-09T04:14:42+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, छप्री हाऊस, भारतीय किसान संघ, न्यू यंग ...

Mixed response to 'Bharat Bandh' in Murtijapur | ‘भारत बंद’ला मूर्तिजापुरात संमिश्र प्रतिसाद

‘भारत बंद’ला मूर्तिजापुरात संमिश्र प्रतिसाद

Next

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, छप्री हाऊस, भारतीय किसान संघ, न्यू यंग क्लब फार्मर्स गृप आदी राजकीय पक्ष व संघटनांनी ''भारत बंद''ला समर्थन दिले. व्यापारी, व्यावसायिक, नागरिक, ग्रामस्थ आणि प्रामुख्याने शेतकरी व शेतकरीपुत्रांसह शेतकऱ्यांबद्दल जिव्हाळा असणाऱ्यांनी ''भारत बंद''मध्ये उत्स्फूर्त सहभाग दिला; मात्र शहरातील बहुतेक बाजारपेठ व व्यापारी प्रतिष्ठाने उघडी असल्याने इतर स्तरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला; मात्र शेतकऱ्यांप्रती आस्था ठेवून फुटपाथ व्यावसायिकांनी आपली दुकाने पूर्णत: बंद ठेवली. शेतकऱ्यांप्रती ताठर व निर्दयी भूमिका घेणाऱ्या शासनाला धडा शिकवून शेतकरीविरोधी तिन्ही कायदे बदलण्यास भाग पाडावे, असे आवाहनही केले.

शहरातील टांगा चौक पोलीस चौकीपासून प्रगती शेतकरी मंडळाचे राजू वानखडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला व प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन व्यापारी बांधवांना करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने स्टेशन विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मंगळवार बाजार मार्गे एसडीओ कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जनमंचचे प्रा. सुधाकर गौरखेडे, छप्री हाऊसचे अरुण बोंडे, शेकापचे विजय गावंडे, कृष्णराव गावंडे, नितीन गावंडे, देवीदास बांगड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, शहराध्यक्ष दिनेश दुबे, जिल्हा सरचिटणीस बंडू डाखोरे, जिल्हा सेवादल कॉंग्रेस सचिव रोहित सोळंके, युवक कॉंग्रेसचे मो. शहाबुद्दीन, राष्ट्रवादीचे श्रीधर कांबे, सोहेल शेख, विनोद बंग, अकबर ठेकेदार, तौसीफ खान, दीपक खंडारे, अमोल तातूरकर, राजेश्वर गाडेकर, इरफान खान, अब्दुल सगीर, श्रीकृष्ण गुल्हाने, रहमान शाह, अब्दुल खालिक, वसीम आसिफ खान सद्दाम पटेल, मोहम्मद शकील आदी मोर्चात सहभागी झाले.

फोटो:

Web Title: Mixed response to 'Bharat Bandh' in Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.