महाराष्ट्र बंदला मूर्तिजापूरात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 06:25 PM2021-10-11T18:25:37+5:302021-10-11T18:25:44+5:30
Maharashtra Bandh : शिवाजी चौकातून शहरात रॅली काढून निदर्शने करण्यात आली.
मूर्तिजापूर : लखीमपुर येथे झालेल्या शेतकरी संहाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह ११ अॉक्टोबर रोजी पुकारलेल्या बंद ला मूर्तिजापूर शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या बंद यशस्वी करण्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्र येऊन शिवाजी चौकातून शहरात रॅली काढून निदर्शने करण्यात आली. टांगा चौकात रॅलीची सांगता करण्यात आली. येथील व्यापारी संघाने बंद ला पाठिंबा देत दुपारी १२ पर्यंत 'बंद' मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आज सकाळपासूनच काही दुकाने बंद होती, तर काही सुरूच होती. आयोजकांनी रॅली काढून केलेल्या बंद च्या आवाहनाला प्रतिसाद देत काही प्रतिष्ठाने बंद राहिली, शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शाळा व औषधी दुकाने, दवाखाने बंदमधून वगळण्यात आले होते. बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे भैय्यासाहेब तिडके, रवी राठी, जगदीश मारोटकर, राम कोरडे, दिवाकर गावंडे, अमोल लोकरे, विष्णू लोडम, जावेद खान, नितीन टाले, राजेंद्र मोहोड, शुभम मोहोड, तुषार दाभाडे, उज्वला राऊत, सुषमा कावरे, उषाताई जामनीकर, शिवसेनेचे संगीत कांबे, विनायक गुल्हाने, अप्पू तिडके, कॉंग्रेसचे दिनेश दुबे, बबन डाबेराव, उर्मिला डाबेराव, बंडूभाऊ डाखोरे, विजय वानखेडे, रोहित सोळंके, अशोक दुबे, प्रहारचे राजकुमार नाचणे, अमोल वानखडे, सागर पुंडकर, संदीप कोहाळे, मिथुन राठोड, संतोष इंगोले, यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते विलास वानखडे यांनी दुचाकीवरुन कर्तव्यावर असलेल्या पोलीसांची तहान भागवली.