आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबूक अकाऊंट हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 16:21 IST2020-11-01T16:12:12+5:302020-11-01T16:21:20+5:30
Cyber Crime, MLA Gopikisan Bajoriya News विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे.

आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबूक अकाऊंट हॅक
अकोला : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा अकोला- बुलडाणा - वाशीम या स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. बाजोरीया यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून, त्यांनी स्वत: च व्हाट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून याबाबतचा खुलासा केला आहे.
आमदार गोपीकिशन बाजोरीया यांचे फेसबुकवर दोन अकाउंट आहेत. त्यापैकी त्यांचे एक अकाऊंट हॅक झाले आहे. त्याबाबत संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी व्हाट्सअॅप स्टेटस च्या माध्यमातून दिली. या अकाउंटवर कोणत्याही प्रकारचा संवाद किंवा व्यवहार करू नये. आपली फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आवाहनही आमदार बाजोरीया यांनी केले आहे.