विमा कंपनीच्या कारभारासह समस्यांच्या मुद्यावर आमदार आक्रमक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:19 AM2021-07-26T04:19:04+5:302021-07-26T04:19:04+5:30
पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत देण्याची कार्यवाही सुरू होणार! अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात बाधित झालेल्या ६ हजार ७८६ ...
पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत
देण्याची कार्यवाही सुरू होणार!
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात बाधित झालेल्या ६ हजार ७८६ कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात येणार असून, ही तातडीची मदत देण्याची कार्यवाही दोन दिवसांत जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेती व पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार असून, नुकसान झालेला कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संपर्क तुटलेल्या गावांसह समस्यांच्या
मुद्यावर बैठक घेण्याचे निर्देश !
अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात संपर्क तुटलेल्या गावांत तातडीने करावयाच्या उपाययोजनांसह नादुरुस्त रस्ते, नाले, खंडित झालेला वीजपुरवठा आदी समस्यांच्या मुद्यांवर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या तातडीने निकाली काढण्याच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.