आमदार निधीतील कामांना ‘ब्रेक’

By admin | Published: September 16, 2014 06:20 PM2014-09-16T18:20:52+5:302014-09-16T18:20:52+5:30

प्रशासकीय मान्यतेनंतरही ७ कोटींची कामे रखडली

MLA's funds 'break' | आमदार निधीतील कामांना ‘ब्रेक’

आमदार निधीतील कामांना ‘ब्रेक’

Next

अकोला : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या फंडातील कोट्यवधींची विकासकामे आचारसंहितेत अडकली. गेल्या ऑगस्ट अखेरपर्यंत पाचही आमदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत ७ कोटी ६ लाख ९२ हजारांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त असली तरी, निम्म्यापेक्षा अधिक कामे अद्याप सुरुच झाली नाहीत. आमदार फंडातील ही कामे आता आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच मार्गी लागू शकतील. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदारांना दरवर्षी प्रत्येकी २ कोटींचा निधी दिला जातो. उपलब्ध निधीतून संबंधित मतदारसंघात आमदारांकडून छोटी-मोठी विकास कामे केली जातात. स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सन २0१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांच्या विद्यमान आमदारांना प्रत्येकी दोन कोटींचा म्हणजे एकूण १0 कोटींचा निधी प्राप्त झाला. या निधीतून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापूर्वी मतदारसंघनिहाय विकास कामे मार्गी लावण्याची लगबग जून महिन्यात सुरू झाली होती. पाचही आमदारांच्या निधीतून कामे प्रस्तावित करून या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ह्यवर्क ऑर्डरह्ण काढण्याच्या प्रयत्नांना निवडणुकीच्या घोषणेसोबतच ह्यब्रेकह्ण लागला. ऑगस्टअखेरपर्यंत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात आमदार फंडातून ७ कोटी ६ लाख ९२ हजार रुपयांच्या विकास कामांसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांपैकी ५0 ते ६0 टक्के कामांच्या ह्यवर्क ऑर्डरह्ण संबंधित यंत्रणांकडून काढण्यात आल्या, त्यापैकी काही विकास कामे सुरू झाली. उर्वरित विकासकामे मार्गी लावण्याची लगबग सुरू असतानाच, १२ सप्टेंबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळून आणि वर्क ऑर्डर प्राप्त झाल्यानंतरही मोठय़ाप्रमाणावर कामे रखडली आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू न होऊ शकलेली कामे आता आचारसंहिता संपल्यानंतरच सुरू होऊ शकतील.

Web Title: MLA's funds 'break'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.