खासदार, आमदारांनी घेतली एसटी प्रशासनाची झाडाझडती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:20 AM2017-09-19T00:20:40+5:302017-09-19T00:20:46+5:30

अकोला: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसेवकांनी रविवारी मध्यवर्ती बस स्थानकावर जाऊन स्वच्छता केली होती. बस स्थानक व परिसरातील अस्वच्छता व किळसवाणे चित्र पाहता खा. संजय धोत्रे, आ.रणधीर सावरकर यांनी सोमवारी पुन्हा मध्यवर्ती बस स्थानक गाठून उपस्थित प्रशासकीय अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. 

MLAs, MLAs take stock of tree administration! | खासदार, आमदारांनी घेतली एसटी प्रशासनाची झाडाझडती!

खासदार, आमदारांनी घेतली एसटी प्रशासनाची झाडाझडती!

Next
ठळक मुद्देबस स्थानकावरील अस्वच्छतेसाठी अधिकार्‍यांची कानउघाडणी!वाहतूक निरीक्षक बेजबाबदार!

अकोला: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसेवकांनी रविवारी मध्यवर्ती बस स्थानकावर जाऊन स्वच्छता केली होती. बस स्थानक व परिसरातील अस्वच्छता व किळसवाणे चित्र पाहता खा. संजय धोत्रे, आ.रणधीर सावरकर यांनी सोमवारी पुन्हा मध्यवर्ती बस स्थानक गाठून उपस्थित प्रशासकीय अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. 
संपूर्ण देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवल्या जात आहे. महापालिका प्रशासनाच्या स्तरावर शहरात स्वच्छता राखण्यासाठी मोहीम आखण्यात आली आहे. रविवारी खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील तसेच नगरसेवकांनी रस्त्यावर उतरत स्वच्छता अभियान राबवले. यादरम्यान, भाजपाचे लोकप्रतिनिधी तसेच नगरसेवक मध्यवर्ती बस स्थानकावर गेले असता परिसरातील अस्वच्छता पाहून एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यय आला. एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकावर मूलभूत सुविधांची ऐशीतैशी झाली आहे. फलाटावर घाण, अस्वच्छतेमुळे  प्रवाशांवर नाकाला रूमाल लावून प्रवास करण्याची वेळ आली आहे. विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष, आगार व्यवस्थापक तसेच वाहतूक निरीक्षकांच्या गलथान कारभाराचा समाचार घेण्यासाठी सोमवारी पुन्हा खा. संजय धोत्रे, आ.रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी मध्यवर्ती बस स्थानक गाठून प्रशासकीय अधिकार्‍यांचा समाचार घेतला. कामकाजात सुधारणा न केल्यास परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांना देण्यात आला. 

आ. बाजोरियांनी सूचना केली तरीही..
मध्यवर्ती बस स्थानकावरील महामंडळाची प्रशासकीय यंत्रणा प्रवाशांना सुविधा देण्यात सपशेल अपयशी ठरली. अधिकार्‍यांचा मनमानी कारभार प्रवाशांच्या जीवावर उठल्याची दखल घेत ऑगस्ट महिन्यात शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनीसुद्धा बस स्थानकाची अचानक पाहणी करून, स्वच्छतेसंदर्भात अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. तरीही हीच परिस्थिती कायम असल्याचे पुन्हा समोर आले.

वाहतूक निरीक्षक बेजबाबदार!
बस स्थानक परिसर व फलाटावर दैनंदिन साफसफाई, स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे यांची आहे.  बस स्थानकावरील किळसवाणे व घाणेरडे चित्र पाहता आ. रणधीर सावरकर यांनी वाहतूक निरीक्षक  इंगळे यांची चांगलीच कानउघाडणी केली. वाहतूक निरीक्षक इंगळे अतिशय बेजबाबदार असून, प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी आगार व्यवस्थापक अरविंद पिसोळे, विभागीय वाहतूक अधिकारी सचिन क्षीरसागर तसेच विभाग नियंत्रक रोहन पलंगे सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. 
-

Web Title: MLAs, MLAs take stock of tree administration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.