रोहयो मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:31 PM2018-12-21T12:31:00+5:302018-12-21T12:31:45+5:30
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यात येणार आहे.
- संतोष येलकर
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक आता ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून हजेरीपत्रक निर्गमित करण्याची कार्यवाही तातडीने सुरू कण्याचे निर्देश जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १७ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना (बीडीओ) दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत काम करणाºया मजुरांचे हजेरीपत्रक निर्गमित करण्याचे काम सध्या पंचायत समिती स्तरावरील ‘डाटा एन्ट्री’ आॅपरेटरमार्फत करण्यात येत आहे; परंतु रोहयो अंतर्गत काम करणाºया मजुरांना मजुरी तातडीने मिळावी, यासाठी २३ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार रोहयो अंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र चालकांमार्फत निर्गमित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. त्यानुषंगाने रोहयो अंतर्गत मजुरांचे हजेरीपत्रक ग्रामपंचायत स्तरावरावरून आपले सरकार केंद्र चालकांमार्फत निर्गमित करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांना दिले.
ग्रामविकास सचिवांनी
व्यक्त केली तीव्र नाराजी!
रोहयो मजुरांचे हजेरीपत्रक ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत निर्गमित करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र चालक, तालुका स्तरावरील डाटा एन्ट्री आॅपरेटर व सहायक कार्यक्रम अधिकाºयांना गत मे महिन्यात तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले; मात्र ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र चालकांमार्फत हजेरीपत्रक निर्गमित करण्याचे काम सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे यासंदर्भात शासनाच्या ग्रामविकास सचिवांनी १७ डिसेंबर रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली.
मजुरी २१ दिवसांत अदा करणे बंधनकारक!
शासन निर्णयानुसार जॉबकार्डधारक रोहयो मजुरांना काम उपलब्ध केलेल्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत मजुरी अदा करणे बंधनकारक राहणार असल्याचेही उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ‘बीडीओं’ना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.