मनसेने केली विज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 03:46 PM2021-02-01T15:46:24+5:302021-02-01T15:47:21+5:30

MNS News महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेने सोमवारी महाविरतणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर विद्युत बिलांची होळी केली.

MNS burns electiricty bills at Akola | मनसेने केली विज बिलांची होळी

मनसेने केली विज बिलांची होळी

Next

अकोला : महावितरण कंपनीकडून सामान्य ग्राहकांना वाढीव वीजबील देण्यात येत असल्याच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेने सोमवारी महाविरतणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर विद्युत बिलांची होळी केली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिलपासून कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. उद्योग व्यवसायांना घरघर लागली आहे. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण या दोन्ही आघाड्यावर नागरिक लढा देत असताना महा विकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बील पाठवून शॉक दिला आहे. या भरमसाठ विज बिल दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्यावतीने सोमवारी विद्युत भवनासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. विज बिल माफी झालीच पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली अकोल्यातील जनतेने वीज बील भरू नयेत. आम्ही त्यांच्या पाठिशी असल्याचे यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे म्हणाले. वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास येऊ नये. कर्मचारी वीज कापण्यास आल्यास मनसैनिक त्यांना सामोरे जातील. त्यानंतर काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल, असा स्पष्ट इशारा मनसे सैनिकांनी दिला. या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड,मनकासेचे सौरभ भगत, राजेश काळे,अरविंद शुक्ला, आदित्य दामले,राकेश शर्मा, राजेश पिंजरकर,दुर्गा भरगड, चंद्रकांत अग्रवाल,अनुज तिवारी, आयुष देशमुख,गोपाल पाथ्रीकर, आशिष गुल्हाने,विजय भोसले, मनोज बोपटे,मंगेश देशमुख, शुभम कावोकार,प्रवीण फुलसावंगेकर,प्रथमेश गावंडे, संजय राठोड,कृष्णा हिवरकर, सागर बावस्कर,पुरुषोत्तम चौधरी, आकाश शेजे आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: MNS burns electiricty bills at Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.