मोबाईलच्या व्यसनाने वाढविला मुलांमध्ये स्थूलपणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:20 AM2021-09-27T04:20:06+5:302021-09-27T04:20:06+5:30

दिनक्रम बदलला पूर्ण शाळेच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचा दिनक्रम होता. मात्र, आता ऑनलाईन शाळेमुळे त्यावर परिणाम झालेला दिसतो. याचा मुलांच्या विकासावर ...

Mobile Addiction Increases Obesity in Children! | मोबाईलच्या व्यसनाने वाढविला मुलांमध्ये स्थूलपणा!

मोबाईलच्या व्यसनाने वाढविला मुलांमध्ये स्थूलपणा!

Next

दिनक्रम बदलला

पूर्ण शाळेच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांचा दिनक्रम होता. मात्र, आता ऑनलाईन शाळेमुळे त्यावर परिणाम झालेला दिसतो. याचा मुलांच्या विकासावर दुष्परिणाम पडू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. सतत मोबाईल, संगणक, टीव्ही, इंटरनेटचा अतिवापर, उशिरा झोपणे, उशिरा उठणे, टीव्ही पाहात जेवण करणे, आदी सवयी विद्यार्थ्यांना लागल्या आहेत. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.

मानसिक लक्षणे

मोबाईलच्या अतिवापराने शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम दिसून येत आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे. याशिवाय अनेक मुले मोबाईलच्या प्रचंड आहारी गेली आहेत. त्यामुळे एकटेपणा, हट्टीपणाही वाढला आहे.

मोबाईल, टीव्ही, संगणक यांसारख्या माध्यमांसमोर तासनतास एका ठिकाणी बसून राहिल्यामुळे शाळकरी मुलांमध्ये स्थूलपणा वाढला आहे. विशेषकरून शहरी भागातील मुलांमध्ये हा प्रकार अधिक दिसतो. स्क्रीन टाईम वाढल्याने नेत्रविकार आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे. प्रत्यक्ष शाळेत जाता येत नसल्याने मुलांची हालचाल कमी झाली आहे. अनेक मुलांचा सूर्यप्रकाशासोबत संबंध येत नसल्याने 'ड' जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येत आहे.

- डॉ. अनुप चौधरी, बालरोगतज्ज्ञ, मनपा, अकोला

Web Title: Mobile Addiction Increases Obesity in Children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.