एसटीमध्ये जागा आरक्षित करण्यासाठी आता मोबाइल अँप!
By admin | Published: September 26, 2016 03:13 AM2016-09-26T03:13:50+5:302016-09-26T03:13:50+5:30
टेक्नोसॅव्ही दिशेने राज्य परिवहन महामंडळाची वाटचाल.
राम देशपांडे
अकोला, दि. २५- प्रवासाला निघण्यापूर्वी जागा आरक्षित करणार्या प्रवाशांकरिता एसटी महामंडळाने 'एमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशन' हे अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मोबाइल अँप सुरू केले आहे. स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी, खर्या अर्थाने आता एसटी महामंडळाने टेक्नोसॅव्ही दिशेने वाटचाल सुरू केली आहे.
बसायला जागा मिळत नसली, तरी मनात तोच विश्वास कायम ठेवत हजारो प्रवासी आजही एसटीच्या प्रवासालाच प्राधान्य देतात. जनतेचा हा विश्वास सदैव अबाधित राहावा, याकरिता एसटी महामंळाने प्रवाशांना पुरविल्या जाणार्या सेवा सुविधांमध्ये बदलण्यास प्रारंभ केला आहे. काळानुरूप नव्या कल्पना मांडल्या जात असून, एसटी सेवा बदलण्याचे प्रयत्न होत आहेत. प्रवासाला निघण्यापूर्वी बसमध्ये जागा आरक्षित करणार्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने ह्यएमएसआरटीसी मोबाइल रिझर्व्हेशनह्ण या नावाने अँड्रॉइड प्रणालीवर आधारित मोबाइल अँप सेवा सुरू केली आहे. ह्यट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चरह्ण या कंपनीने विकसित केलेले हे अँप गूगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. युजर फ्रेंडली असलेल्या या अँपच्या वापरकर्त्यास सर्वप्रथम स्वत:ची संपूर्ण माहिती देऊन स्वतंत्र खाते तयार करावे लागेल. ज्या-ज्या ठिकाणी एसटी महामंडळाची बस जाते, त्या सर्व शहरांचा व गावांचा अंतर्भाव या अँपमध्ये करण्यात आला आहे. इच्छित स्थळी जाण्यासाठी सेमी लक्झरी, अँशियाड, ऑडनरी, शिवनेरी व रातराणी अशा सर्व प्रकारच्या गाड्या आणि त्यांच्या वेळा या अँपमध्ये पाहता येत असल्याने, सोईस्कर बसमधील जागा या अँपच्या माध्यमातून आरक्षित करता येते. चार्टवर दर्शविलेल्या आसनांवर बोटाने स्पर्श करताच हिरव्या रंगांत बदलतात व ती आरक्षित करतात येतात. यामध्ये रंग पांढर्या रंगाची आसने अनारक्षित असल्याचे दर्शवितात, तर करड्या रंगाची आसने बुक असल्याचे दर्शवितात. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेली आसने अनुक्रमे जांभळय़ा व फिकट शेंदरी रंगाने दर्शविण्यात आली आहेत. पूर्णत: आरक्षित झालेल्या असनांचा रंग लाल झालेला दिसून येतो. प्रवास भाडे किती लागणार, याची माहितीदेखील खालीच मिळते. यामध्ये सवलतींचा लाभ घेणार्या प्रवाशांना स्वत:च्या ओळखपत्राचा पुरावा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अँपद्वारे जागा आरक्षित करताना कार्ड, नेटबँकिंग आणि वॉलेट असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. आधुनिकतेकडे वाटचाल करणार्या एसटी महामंडळाने तळहातावर उपलब्ध केलेली ही सुविधा प्रवाशांना आकर्षित करीत आहे.