माेबाइल कंपन्या माेकाट; नगररचना विभागात फाइल धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:46+5:302021-04-17T04:17:46+5:30

नगररचना विभागाकडून ‘रिस्पाॅन्स’नाहीच ! माेबाइल कंपन्यांनी शहरातील इमारतींवर टाॅवरची उभारणी केली आहे़ यासाठी नगररचना विभागाने देखील मंजुरी दिली आहे़ ...

Mobile companies market; File dust in town planning department | माेबाइल कंपन्या माेकाट; नगररचना विभागात फाइल धूळखात

माेबाइल कंपन्या माेकाट; नगररचना विभागात फाइल धूळखात

Next

नगररचना विभागाकडून ‘रिस्पाॅन्स’नाहीच !

माेबाइल कंपन्यांनी शहरातील इमारतींवर टाॅवरची उभारणी केली आहे़ यासाठी नगररचना विभागाने देखील मंजुरी दिली आहे़ मालमत्ता कर विभागाने कारवाईच्या अनुषंगाने तयार केलेली फाइल नगररचना विभागाकडे सादर केली असून त्यावर या विभागाकडून काेणताच ‘रिस्पाॅन्स’मिळत नसल्याची माहिती आहे़

मनपा आर्थिक संकटात; दुर्लक्ष का?

अकाेलेकरांनी टॅक्स जमा करण्याकडे पाठ फिरविल्याची परिस्थिती आहे़ दुसरीकडे माेबाइल कंपन्यांकडे ५ काेटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता कर थकीत आहे़ हा कर वसूल करण्यासाठी प्रशासन पुढाकार का घेत नाही,असा सवाल उपस्थित हाेत आहे़

अशी आहे माेबाइल टाॅवरची संख्या

रिलायन्स जिओ- ५७

एटीसी- ३६

जीटीएल व्हीओ- ३०

आयडिया- २६

इन्डस टाॅवर- २२

एअरटेल- २२

बीएसएनएल- १९

वाेडाफाेन- ०८

Web Title: Mobile companies market; File dust in town planning department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.